
Multibagger Stocks | आज आपण एक अश्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने मागील तिमाहीत छप्पर फाड परतावा दिला आहे. आणि जबरदस्त निकालानंतर, अर्थ तज्ञ या स्टॉकच्या बाबतीत अतिशय उत्साही आहेत. आणि हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते, हा स्टॉक 314 रुपये पर्यंत जाऊ शकतो. सध्या या स्टॉक ची किंमत 271.50 रुपये आहे.
धमाकेदार स्टॉक बद्दल सविस्तर :
आपण ज्या स्टॉकबद्दल माहिती घेत आहोत तो आहे पूनावाला फिनकॉर्प. ही कंपनी पूनावाला ग्रुपची वित्त सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना धमाकेदार परतावा मिळवून दिला आहे. या स्टॉकने अवघ्या दोन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे, आणि उत्कृष्ट परतावा दिला आहे. दोन वर्षांत या स्टॉकने 1926% टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स सातत्याने नवनवीन उच्चांक गाठत आहेत. उत्कृष्ट त्रैमासिक निकालानंतर, अर्थ तज्ञ या स्टॉकवर गुंतवणूक करण्याबाबत उत्साही आहेत. आणि खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते, हा स्टॉक लवकरच 314 रुपये पर्यंत पोहोचू शकतो. सध्या या स्टॉकची नवीनतम उच्चांक पातळी 271.50 रुपये आहे.
पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचा इतिहास :
पूनावाला फिनकॉर्प कंपनी चा शेअर NSE वर 22 मे 2022 रोजी,13.40 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करत होता.आता तो वाढून 271.50 रुपयेवर गेले आहे. या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1926.12% परतावा मिळवून दिला आहे. म्हणजेच दोन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 20.33 लाख रुपये मिळाले असते.
पूनावाला फिनकॉर्प स्टॉकची कामगिरी :
कंपनीचा नफा जबरदस्त आहे. क्रेडिट वितरण आणि चांगल्या मार्जिनमुळे एप्रिल-जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 118% वाढ झाली आहे. आणि निव्वळ नफा 141 कोटी नोंदवला गेला आहे. मागील तिमाहीत कंपनीची कमाई वाढून 572 कोटी रुपये एवढी झाली आहे. जी मागील वर्षीच्या कालावधीत 483 कोटी रुपये होती. पूनावाला फिनकॉर्प आणि मॅग्मा फिनकॉर्पमधील विलीनीकरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे कंपनीला आता चांगला फायदा होत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.