13 December 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स पुन्हा तेजीत, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पुन्हा वाढला, कारण जाणून घ्या

Yes bank share price

Yes Bank Share Price | मागील ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. स्टॉकमध्ये 2.47% वाढ झाली असून तो दिवस अखेर 14.94 रुपयांवर बंद झाला. येस बँक चे बाजार भांडवल 37,432.14 कोटी रुपये आहे. 7 एप्रिल 2022 रोजी येस बँकेच्या शेअरची किंमत 16.25 रुपयांवर पोहोचली.

येस बँक ही एक खाजगी क्षेत्रातील बँक असून त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत इक्विटीमध्ये गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. येस बँक आपले 10% इक्विटी हक्क कार्लाइल ग्रुप आणि अॅडव्हेंट इंटरनॅशनलला 8898 कोटी रुपयांना विकणार आहे. बँक या दोन्ही गुंतवणूकदारांना 13.78 रुपये प्रति शेअरच्या किमतीवर 369 कोटी इक्विटी शेअर्स जारी करेल.

येस बँक कार्लाइल ग्रुपला 13.78 रुपये प्रति शेअर या दराने 184 कोटी इक्विटी शेअर्स जारी करेल. येस बँके भागभांडवल मधील काही वाटा मोठ्या हेज फंड कंपन्यांना देखील विकत आहे, यात CA Bossue आणि Verventa Holdings चा समावेश आहे. येस बँकेने बीएसई ला कळवले आहे की खाजगी गुंतवणूकदार आपले अधिकृत भागभांडवल सध्या जे 6,200 कोटी रुपयांवर आहे ते 8,200 कोटी रुपयेपर्यंत वाढवतील.

शेअरची किंमत वाढली :
गुंतवणुकीची सकारात्मक बातमी येताच, येस बँकेच्या शेअरमध्ये 2.47% वाढ झाली आणि शेअर्स ची किंमत 14.94 रुपयांवर जाऊन पोहोचली. बाजार भांडवलाबद्दल बोलायचे झाले तर येस बँकेचे बाजार भांडवल 37,432.14 कोटी रुपये आहे. येस बँकेच्या शेअरची किंमत 7 एप्रिल 2022 रोजी 16.25 रुपयांवर ट्रेड करत होती. येस बँकच्या किमतीचा हा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.

तिमाही निकालांमध्ये नफा :
एक काळ होता जेव्हा येस बँक चालेल की बंद होईल असा प्रश्न विचारला जात होता तर आता बाजारात येस बँकच्या नफ्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे. येस बँकेचा मागील जून तिमाहीत नफा 50 टक्क्यांनी वाढला. बँकेने 311 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत बँकेला 207 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून 5,916 कोटी रुपयेपर्यंत गेले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price has risen after declaring huge investment incoming on 30 July 2022.

हॅशटॅग्स

Share price(24)Yes bank(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x