
Multibagger Stocks | सध्या भारतीय शेअर बाजारात आपण मंदीची चाहूल पाहू शकतो. मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये देखील जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 5 दिवसांत मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यात मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 18 रुपयेवरून वाढून 50 रुपयेवर पोहचली आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 121 टक्के परतावा कमावला आहे. नुकताच मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीने SRBH मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एक सामंजस्य करार संपन्न केला आहे.
SRBH मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ई-वाहने आणि व्यावसायिक ई-वाहने बनवण्याचा व्यवसाय करते. आज गुरूवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.31 टक्के वाढीसह 47.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनी ई-टिपर्स, ई-प्राइम मूव्हर्स, ई-ड्रॅगर्स, मिनी बसेस, कार्गो कंटेनर इत्यादी बनवण्याचे काम करते. तर SRBH मोटर कंपनीचे संशोधन आणि विकास केंद्र मध्यप्रदेश मधील महियार याठिकाणी आहे. नुकताच SRBH कंपनीने तेथे संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी 20 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
नवीन सामंजस्य करारा अंतर्गत SRBH कंपनीचे संशोधन आणि विकास केंद्र आता मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीचा विभाग बनले आहे. याशिवाय या दोन्ही कंपन्यांनी वडोदरा केंद्रात मालवाहू कंटेनरचे बनवण्याचे काम देखील सुरू केले आहे. पुढील एक महिन्यात बडोदा प्लांटमधून मालवाहू कंटेनर बनून बाहेर येतील.
पहिल्या टप्प्यात मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या बडोद्यातील या केंद्रातुन वार्षिक 700-800 कंटेनर बनवले जाणार आहे. मागील वर्षीच्या AGM मध्ये मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीने त्यांची 4 चाकी, लोडर, तीन चाकी, हायस्पीड रिक्षा विकसित केल्याची घोषणा केली होती. आणि या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीला दुचाकी, हायस्पीड थ्री व्हीलर, हाय स्पीड व्हेइकल आणि थ्री व्हीलर लो स्पीड ई व्हेइकलच्या बॅटरीसाठी ASI-156 प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीकडे स्वतःचा CED कोटिंग प्लांट आहे. हा गुजरात राज्यातील पहिला सीईडी कोटिंग प्लांट आहे. आत्तापर्यंत गुजरात राज्यात ऑटोमोबाईल क्षेत्रातील एकही CED प्लांट सुरू झालेला नाहीये. मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीने यापूर्वी घोषणा केली होती की त्यांना तीन चाकी L3 वाहनाची निर्मिती करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक व्हिंटेज कार, इलेक्ट्रिक गोल्फ कार बनवण्याचा व्यवसाय करते.
मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनी भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात व्यवसाय करणारी सुरुवातीच्या पहिल्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या ग्राहक वर्गात हॉस्पिटॅलिटी उद्योग, गोल्फ कोर्स, क्लब आणि रिसॉर्ट्स इत्यादी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्या सामील आहेत.
या कंपनीने इलेक्ट्रिक टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलरचे उत्पादन करण्यासाठी देखील संशोधन आणि विकास योजना सुरू केली आहे. 30 सप्टेंबर 2019 रोजी मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 34 पैशांवर ट्रेड करत होते. मर्क्युरी ईव्ही टेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14386 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.