15 December 2024 10:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Paytm Share Price | सुवर्ण संधी! 63 टक्क्यांनी स्वस्त झालेला पेटीएम शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या

Paytm Share Price

Paytm Share Price | वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजेच पेटीएम कंपनीचे शेअर्स सध्या जबरदस्त तेजीत वाढत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजने पेटीएम स्टॉकची अपडेट कव्हर करण्यास सुरुवात केली आहे. काल सोमवारी देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 370.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनी अंश )

काही आठवड्यापूर्वी आरबीआयने पेटीएम कंपनीला पेमेंट्स बँक सुविधा बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पेटीएम स्टॉक अक्षरशः क्रॅश झाला होता. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी पेटीएम स्टॉक 4.50 टक्के वाढीसह 406.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

येस सिक्युरिटीज फर्मच्या मते, पेटीएम कंपनीचे वॉलेट व्यवसायावरील अवलंबित्व आधीच पेमेंट्स मधील महसुलाच्या एक षष्ठांश इतके कमी झाले आहे. पेटीएम कंपनीच्या 6,000 कोटी रुपयेच्या एकूण महसुलातून वॉलेट व्यवसायाचा 1,000 कोटी रुपये महसूल कमी झाला आहे. त्यामुळे कंपनीला याचा जास्त नुकसान होणार नाही.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेटीएम कंपनीला मल्टी-बँक मॉडेलमध्ये थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून UPI मध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे पेटीएम कंपनीचा UPI व्यवसाय अबाधित आहे. मल्टी-बँक मॉडेल अंतर्गत, OCL ने Axis बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याशी करार केला आहे. आणि पेटीएम कंपनीच्या UPI व्यवसायात कोणताही व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यासाठी पेटीएम UPI हॅण्डल सामुहिकरित्या येस बँकमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहे.

येस बँक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी पेटीएम स्टॉक खरेदी केला तर मजबूत फायदा होईल. तज्ञांनी पेटीएम शेअर्सवर बाय रेटिंग देऊन 505 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गनने पेटीएम स्टॉकवर 555 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 998 रुपये होती. पेटीएम स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 63 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Paytm Share Price today on 19 March 2024

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x