Multibagger Stocks | पैशाचा छापखाना! या 8 मल्टिबॅगर शेअर्सनी 8375 टक्क्यांपर्यंत परतावा दिला, फक्त 1 वर्षात कमाई, खरेदी करणार?

Multibagger Stocks | आज आर्थिक वर्ष 2023 ची समाप्ती झाली. मागील एका वर्षापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता निर्माण झाली होती. या काळात सर्व प्रमुख बेंचमार्कने नकारात्मक वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये सेन्सेक् 1 टक्के कमजोर झाला. तर दुसरीकडे बीएसईचे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक या कालावधीत अनुक्रमे 1.12 टक्के आणि 5.78 टक्के कमजोर झाला होते. या काळात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 1,000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला होता. आज या लेखात आपण अशाच 8 स्टॉक्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1) इयंत्रा व्हेंचर्स :
या कंपनीचे शेअर्स सप्टेंबर 2022 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर 8,375 टक्के वाढले आहेत. आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स सर्वाधिक परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत होते. 5 सप्टेंबर 2022 रोजी हा स्टॉक 3.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जो आता वाढून 290.70 रुपये किमतीवर पोहचला आहे.
2) राज रेयॉन इंडस्ट्रीज :
आर्थिक वर्ष 2023 मध्ये या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 3,243 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर 1.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 65.20 रुपये किमतीवर पोहचला आहे.
3) पल्सर इंटरनॅशनल :
या कंपनीचे शेअर्स मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. तेव्हापासून या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 2,078 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 मे 2022 रोजी हा स्टॉक 2.07 रुपये किमतीवर ट्रेड करत होता जो आता वाढून 45.09 रुपये किमतीवर पोहचला आहे.
4) श्री गंगा इंडस्ट्रीज :
आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 एप्रिल 2022 रोजी हा स्टॉक 3.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जो आता वाढून 66.50 रुपये किमतीवर पोहचला आहे.
5) K & R रेल इंजिनियरिंग :
आर्थिक वर्ष 2023 मध्ये या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,980 टक्के परतावा कमावून दिला होता. 31 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 19.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 406.80 रुपये किमतीवर पोहचला आहे.
6) मानक कॅपिटल मार्केट :
9 मे 2022 रोजी हा स्टॉक 2.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जो आता वाढून 44.40 रुपये किमतीवर पोहचला आहे. या आर्थिक वर्षात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 1,556 टक्के परतावा कमावून दिला आहे.
7) झवेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल :
आर्थिक 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,263 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 मार्च 2022 रोजी हा स्टॉक 4.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होता जो आता वाढून 63.67 रुपये किमतीवर पोहचला आहे.
8) कन्या ग्लोबल :
चालू आर्थिक वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1,132 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टॉक बीएसई इंडेक्सवर 0.70 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. जो आता वाढून 8.26 रुपयेवर पोहचला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks has given huge Return to shareholders check details on 31 March 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON