10 May 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Multibagger Stocks | 1 महिन्यात 25% परतावा, हे 3 मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मोठा नफा देत आहेत

Multibagger Stocks

Multibagger Stock | मागील एका महिन्यात अश्या खूप कंपन्यां आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज आपण अशा तीन जबरदस्त शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी एका महिन्यात आपल्या भागधारकांना तब्बल 25 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉक : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगातील सर्व देशातील शेअर बाजारात गुंतवणूकदारांना खूप जबरदस्त नुकसान सहन करावं लागले आहे. आता पुन्हा एकदा शेअर बाजार रिकव्हरी मोड मधे जबरदस्त वाढताना दिसत आहे. मागील एका महिनाभरात अनेक कंपन्यांनी आपल्या भागधारकांना जबरदस्त नफा करून दिला आहे. या लेखात आपण अशा तीन शेअर्सबद्दल जाणून घेऊ ज्यांनी फक्त एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.

1) Schaeffler India Ltd : या कंपनीच्या शेअर्सच्या मागील एका महिन्याच्या कामगिरीचे निरीक्षण केले तर, या काळात NSE मधील या शेअरची किंमत 15.81 टक्के वाढली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्स ने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 404.60 रुपये नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये आपले पैसे लावले होते त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. फक्त एका वर्षाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीच्या शेअर्स नी 61.96 टक्के परतावा दिला आहे.

2) Elgi Equipments Ltd : 18 जुलै ते 16 ऑगस्ट या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 15.48 टक्के वाढ पाहायला आहे. म्हणजेच एका महिन्यात गुंतवणूकदारांना प्रति शेअर 57.50 रुपये इतका जबरदस्त नफा मिळाला आहे. त्याच वेळी, या वर्षाच्या परताव्याबद्दल माहिती घेतली तर असे दिसेल की, कंपनीने भागधारकांना एका वर्षात तब्बल 40.68 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

3) फाइन ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीज लिमिटेड : फाइन ऑरगॅनिक्स कंपनीच्या गुंतवणूकदारांना मागील एका महिन्यात या कंपनी च्या शेअर्स नी छप्पर फड परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 25.40 टक्के पर्यंत वाढ पाहायला मिळाला आहे. या संपूर्ण एकावर्षात Fine Organics कंपनीने आपल्या भागधारकांना भरघोस परतावा मिळवून दिला आहे. कंपनीच्या पोझिशनल भागधारकांना या एका वर्गात आतापर्यंत तब्बल 64.57 टक्के नफा मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks List has given huge returns in short time on 18 August 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या