
Multibagger Stocks | आरती इंडस्ट्रीज ही एक स्पेशॅलिटी केमिकल क्षेत्रात उद्योग करणारी कंपनी असून, या कंपनीचे शेअर्स अशा गटात सामील आहेत, ज्यांनी मागील दोन दशकांत आपल्या गुंतवणूकदाराना बंपर परतावा कमावून दिला आहे. आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ संयम राखण्याचे फळ दिले आहेत. या कंपनीच्या शेअरनी शेअर बाजारात कमालीची कामगिरी केली असून प्रचंड नफा ही कमावला आहे.
2022 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत जाहीर केलेल्या निकालानंतर केआर चोक्सी फर्मने आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने आरती इंडस्ट्रीज कंपनीसाठी 841.00 रुपये लक्ष्य किंमत निर्धारित केली असून, ही सध्याच्या ट्रेडिंग किंमतीपेक्षा 28.71 टक्के अधिक आहे.
23 वर्षात मिळाला 600 पट परतावा :
1 जानेवारी 1999 रोजी आरती इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर पहिल्यांदा सूचीबद्ध झाले होते. त्या वेळी या कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग किंमत फक्त 1.08 रुपये होती. 18 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर बाजार बंद होताना आरती इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 654.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशाप्रकारे मागील 23 वर्षांत आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 60,478.70 टक्क्यांची अप्रतिम वाढ पाहायला मिळाली आहे. आरती इंडस्ट्रीज कंपनीने मागील.23 वर्षात आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 600 पट अधिक वाढवले आहे.
एक लाखावर 6 कोटी परतावा :
जर तुम्ही 1 जानेवारी 1999 रोजी आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 6 कोटी रुपये झाले असते. 2022 या वर्षात आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 35.69 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपासून आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसत असुन स्टॉकची किंमत पडली आहे.
कंपनीचा नफा 16 टक्के घटला :
2022 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत आरती इंडस्ट्रीज कंपनीच्या नफ्यात 16 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. कंपनीने 124.48 कोटी रुपये नफा संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने 149.95 कोटी रुपये नफा संकलित केला होता. दुसरीकडे, जर आपण कंपनीच्या महसुलाची माहिती तपासली तर तुम्हाला समजेल की, सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या एकूण महसूल संकलनात 34 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली असून एकूण महसूल 1,685.03 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1,256.37 कोटी रुपये एकूण महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.