
Multibagger Stocks | गौतम अदानी यांच्या अदानी उद्योग समूहातील चार स्टॉक मध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. जगातील अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी आणि भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना खूप मागे टाकून पहिला क्रमांक मिळवला आहे.
अदानी समूहातील शेअर्सच्या किमती :
शेअर बाजारात मागील काही काळापासून अस्थिरता आणि चढ-उतार पाहायला मिळत आहे. असे असतानाही, शेअर बाजारात अदानी समुहाचे शेअर्स आपल्या भागधारकांना कमालीचा परतावा देत आहेत. अदानी समूहातील सर्व 7 कंपन्यांपैकी शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या 4 कंपन्यांच्या स्टॉक मध्ये डोळे दिपवणारी वाढ झाली आहे. हे स्टॉक मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. या चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत आणि जगातील अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. गौतम अदानी यांनी अध्यक्ष मुकेश अंबानी यांना खूप मागे टाकुन पहिला क्रमांक पटकावला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी सध्या 11व्या क्रमांकावर आहेत, तर गौतम अदानी तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अदानी पॉवर :
सर्व प्रथम आपण अदानी समूहाच्या चत्या कंपनीबद्दल माहिती घेऊ ज्याने शेअर बाजारात कमालीचे प्रदर्शन करून गौतम अदानी यांना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवले आहे. आपण ज्या कंपनीबद्दल चर्चा करतोय ती कंपनी आहे अदानी पॉवर. ह्या कंपनीचे शेअर 6 महिन्यांपूर्वी 121.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आता शेअर ची किंमत 397.60 रुपयेवर पोहोचली आहे. सहा महिन्यात या स्टॉकनी आपल्या गुंतवणूकदारांना 266.44 टक्के परतावा मिळवून दिला आहे. अदानी पॉवरच्या स्टॉकची 6 महिन्यांची उच्चांक पातळी किंमत 432.50 रुपये असून नीचांकी पातळी किंमत 120.50 रुपये आहे.
अदानी गॅस :
अदानी गॅस कंपनीचा शेअर भरघोस परतावा देण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अदानी गॅसच्या शेअरनी अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. या कालावधीत 1661 रुपयांवर ट्रेड करणारा स्टॉक सध्या 3635.40 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. हा स्टॉकमध्ये जवळपास 118.76 टक्क्यांची वाढ झाली असून गुंतवणूकदारांनाही याचा खूप फायदा झाला आहे. स्टॉकची 6 महिन्यांतील उच्चांक पातळी किंमत 3816 रुपये असून आणि नीचांक पातळी किंमत 1610 रुपये होती.
अदानी विल्मर :
अदानी विल्मार या कंपनीचा IPO नुकताच जाहीर झाला होता. तरी देखील या स्टॉकने खूप कमी कालावधी मधे घसघशीत परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांच्या काळात अदानी विल्मर च्या स्टॉकमध्ये 112 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कालावधीत 344.20 रुपयांवर ट्रेड करणारा स्टॉक सध्या 729.70 रुपये प्रति शेअर किमतीवर जाऊन पोहोचला आहे. स्टॉकची मागील सहा महिन्यांची उच्चांक पातळी किंमत 878 रुपये आहे. आणि त्याची नीचांकी पातळी किंमत 338 रुपये होती.
अदानी एंटरप्रायझेस :
अदानी एंटरप्रायझेसच्या स्टॉकमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. या शेअर मध्ये मागील काही महिन्यात भरघोस वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना 100 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्याना आता दुप्पट परतावा मिळाला आहे. 6 महिन्यांपूर्वी 1734.10 रुपयांवर ट्रेड करणारा हा स्टॉक सध्या 3463.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. स्टॉकची मागील सहा महिन्यांची उच्चांक पातळी किंमत 3507.95 रुपये आहे. आणि नीचांकी पातळी किंमत 1686.65 रुपये नोंदवली गेली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.