11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

Zomato Share Price | झोमॅटोचे शेअर्स 1 दिवसात 10 टक्के वाढले, स्टॉक खरेदीमध्ये अचानक झुंबड का? फायद्याचं कारण आलं समोर

Stock In Focus

Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात NSE निर्देशांकावर 10 टक्क्यांची वाढीसह 70.55 रुपयांवर ट्रेड करत होते. BSE निर्देशांकावर सुरुवातीच्या काही तासात Zomato कंपनीचे शेअर्स 72.25 रुपयांवर ट्रेड करत होते. याआधी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 63.95 रुपये किमतीत ट्रेड करत होते. वर्ष दर वर्ष आधारावर Zomato कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 50.51 टक्के कमजोर झाले आहेत. मात्र, आता सरॉकमध्ये खालच्या स्तरावरून सुधारणा होताना दिसत आहे. मागील पाच दिवसांत झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के वाढले आहेत.

Zomato चे तिमाही निकाल :
झोमॅटो कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागे सप्टेंबर तिमाहीचे सकारात्मक निकाल हे महत्वाचे कारण आहे. वास्तविक पाहता झोमॅटो कंपनीचा तोटा सप्टेंबरच्या तिमाही निकालात मोठ्या प्रमाणात कमी झालेला आपण पाहू शकतो. या कंपनीचा एकत्रित निव्वळ तोटा जुलै ते सप्टेंबर तिमाही दरम्यान वार्षिक 430 कोटी रुपयांवरून 251 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे. त्याच वेळी, या कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 62.2 टक्के वाढला असून 1,661 कोटी रुपयांवर गेला आहे. झोमॅटोचे सीईओ नुकताच जाहीर केलेल्या तिमाही निकालावर म्हणाले की, “आमचा फूड डिलीव्हरी व्यवसाय दर वार्षिक आधारावर वाढत चालला असून कंपनीचा तोटा कमी होत चालला आहे. माझा विश्वास आहे की Zomato फूड डिलिव्हरी व्यवसायात खूप वेगाने वाढ करेल आणि नफा कमवेल”.

IPO आल्यानंतर शेअरची कामगिरी :
Zomato या फूड डिलिव्हरी कंपनीचा IPO 2021 मध्ये आला होता. Zomato च्या IPO ने शेअर मार्केटमध्ये शानदार एंट्री केली होती. NSE इंडेक्सवर स्टॉक 76 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 52.63 टक्क्यांच्या वाढीसह 116 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. मात्र नंतर झोमॅटोचे सतत गडगडत राहिले आणि स्टॉक निम्म्यावर आला. Zomato च्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 40.60 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 169 रुपये आहे. हा स्टॉक सध्या आपल्या सार्वकालिक उच्चांक किमतीच्या तुलनेत 58 टक्के पडला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Zomato share price return on investment check details on 12 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x