 
						Multibagger Stocks | Atam Valves कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरने चालू वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 530 टक्क्यांचा मजबूत परतावा कमावून दिला आहे. एवढा भरघोस परतावा दिल्यानंतर आता या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. या कंपनीने सुरुवातीला 12 ऑक्टोबर 2022 जी बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती, त्यात बदल करून आता कंपनीने 24 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या धरे धारकांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
बोनस शेअर आणि रेकॉर्ड तारीख :
कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सादर केलेल्या कागद पत्रात म्हंटले आहे की, “कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1:1 या प्रमाणात पूर्ण पेड-अप बोनस शेअर्स वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्यासाठी 24 ऑक्टोबर, 2022 “रेकॉर्ड तारीख” म्हणून जाहीर केली आहे. वरील रेकॉर्ड तारखेनुसार प्रत्येक विद्यमान 1 इक्विटी शेअरवर 1 इक्विटी बोनस शेअर मोफत देण्यात येईल”.
लाभांश आणि परतावा :
Atma Volvs कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा आणि लाभांश कमावून दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 2 रुपये अंतिम लाभांश घोषित केला होता. कंपनी आपल्या कमलवलेल्या नफ्यातून काही वाटा शेअर धारकांसोबत वाटून घेते यालाच लाभांश म्हणतात. आणि ही शेअर धारकांची एक प्रकारची इन्कम असते, जी त्यांना तिमाही, सहामाही, किंवा वार्षिक आधरावर कंपनीकडून दिली जाते.
शेअरची वाटचाल :
Atma Volves कंपनीचा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत सामील झाला आहे. चालू वर्षात हा स्टॉक 47.50 रुपये किमतीवरून 299.65 रुपये किमतीवर पोहोचला आहे. या कालावधीत 2022 या वर्षात शेअरची किंमत 530 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या स्मॉल-कॅप कंपनीच्या स्टॉकने 112.60 रुपये किमतीवरून 299.65 रुपये किमतीवर उडी घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरच्या किमतीत 166 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 370 रुपये आहे, आणि सर्वकालीन नीचांकी पातळी कायम 37.25 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		