
Multibagger Stocks | Gensol Engineering Ltd शेअर बाजारात ट्रेड करणारा असा स्टॉक आहे हा ज्याने खूप कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Gensol Engineering Ltd कंपनीचे शेअर्स 1,390.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, आणि दिवसा अखेर शेअर्स वाढीसह 1,426.45 रुपये किमतीवर बंद झाले होते. मागील एका वर्षात या शेअरने आपल्या भागधारकांना घसघशीत परतावा कमावून दिला आहे. हा शेअर सुरुवातीच्या काळात 67 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन आता ह्याची किंमत 1,390 रुपयांपर्यंत गेली आहे.
Gensol Engineering Ltd शेअरचा किंमत इतिहास :
18 ऑक्टोबर 2019 रोजी Gensol Engineering Ltd कंपनीचे शेअर 63.41 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या ह्या शेअर्सची ट्रेडिंग किंमत 1,390.65 रुपये पर्यंत गेली आहे. या कालावधीत स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 2,093.11 टक्के चा अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच, जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी स्टॉकमध्ये फक्त 1 लाख लावले असते, आणि आपली गुंतवणुक होल्ड करून ठेवली असती तर सध्या तुम्हाला 21.93 लाख रुपये नफा झाला असता. त्याच वेळी, मागील एका वर्षात हा स्टॉक 67 रुपयांवरून 1,390 रुपयेपर्यंत वाढला आहे. एक वर्षापूर्वी ह्या स्टॉकची किंमत फक्त 67 रुपये होती. आणि त्यात वाढ होऊन आता तो 1390 रुपये वर ट्रेड करत आहे. या कालावधीत जेनसोल च्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना 1,948.69 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या स्टॉक मध्ये एक लाख रुपये लावले असते आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 20 लाख रुपये झाले असते.
कंपनीबद्दल सविस्तर :
जेन्सॉल इंजिनियरिंग लिमिटेड ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून व्यावसायिक सेवा आणि उद्योगात गुंतेलेली आहे. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सौर प्रकल्पांसाठी सेवा सुविधा प्रदान करण्याचे काम करते. कंपनीचे मुख्य कार्यालय अहमदाबाद आणि मुंबई येथे असून ही कंपनी 18 भारतीय राज्यांमध्ये उद्योग करते. जगभरात कंपनीचे केनिया, चाड, गॅबॉन, इजिप्त, सिएरा लिओन, येमेन, ओमान, इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये सध्याचे मोठे प्रकल्प कार्यरत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.