
Multibagger Stock | कोरोनामुळे मागील दोन वर्ष गुंतवणूकदारांसाठी अस्थिरतेची आणि फार गोंधळाची होती. गुंतवणुकदारांना शेअर बाजारातून नफा कमावता आला नाही. कोरोना मुळे लॉक डाऊन लागला आणि शेअर बाजारात पडझड सुरू झाली होती. मात्र या कठीण काळातही अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने अस्थिरतेच्या काळातही आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “ग्रॅविटा इंडिया”. मागील दोन वर्षांत या कंपनीचे शेअर 650 टक्क्यांनी वाढले आहेत. आता या शेअरमध्ये परकीय गुंतवणूकदारांचा गुंतवणूकीचा ओघ सुरू झाला आहे. भारतातील अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध गुंतवणूकदारानी या स्टॉक मध्ये पैसे लावले आहेत, त्यापैकी एक आशिष कचोलिया हे सुध्दा आहेत.
शेअरची कामगिरी :
दोन वर्षांपूर्वी ग्रॅविटा इंडिया कंपनीचा शेअर किंमत 45 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन आता हा स्टॉक 345 रुपये किमतीवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 650 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, वर्षभरापूर्वी या कंपनीचा शेअर 100 रुपयेवर ट्रेड करत होता. म्हणजेच, जर तुम्ही एक वर्षापूर्वी ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर खरेदी केले असते तर आज तुम्हाला 70 टक्के परतावा मिळाला असता.
परकीय गुंतवणूक :
ग्रॅविटा इंडिया कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नचे निरीक्षण केल्यास आपल्यास समजेल की, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीने ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणत खरेदी केले आहेत. या विदेशी गुंतवणुक फर्मने ग्रॅविटा इंडिया कंपनीचे 5.56 लाख शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. यासाठी अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाने 18.47 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे. हा संपूर्ण गुंतवणूक व्यवहार 7 सप्टेंबर 2022 रोजी पूर्ण झाला होता.
आशिष कचोलियाची शेअर होल्डिंग :
एप्रिल ते जून 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग चार्ट पॅटर्ननुसार आशिष कचोलिया यांनी ग्रॅविटा इंडिया कंपनीचे 12,49,608 शेअर्स होल्ड केले आहेत. आशिष काचोलिया यांच्याकडे कंपनीचा एकूण 1.81 टक्के वाटा आहे. जानेवारी ते मार्च 2022 पर्यंतच्या शेअरहोल्डिंग चार्ट पॅटर्ननुसार आशिष कचोलिया यांच्याकडे कंपनीत 1.35 टक्के वाटा होता, त्यानंतर काचोलीया उनाई आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.