
Multibagger Stocks | ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस ही एक स्मॉल-कॅप कंपनी असून फक्त BSE वर ‘M’ श्रेणी अंतर्गत सूचीबद्ध करण्यात आली आहे. ग्रेटेक्स कंपनीच्या स्टॉकमध्ये सलग सातव्या दिवशी 5 टक्केचा अप्पर सर्किट लागला आहे. ऑक्टोबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात या स्टॉक मध्ये 21.5 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. Gretex कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्स मध्ये सूचीबद्ध झाल्यानंतर 2 वर्षांहून अधिक कालावधी झाला असून एक मल्टी स्टॉक म्हणून नावाजला आहे. एवढेच नाही तर गेल्या 6 महिन्यांत ग्रेटेक्स कंपनीच्या स्टॉकने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3 लाखांहून जास्त परतावा दिला आहे. सध्या हा स्टॉक सर्वकालीन उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत आहे. आणि कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना 8:1 प्रमाणत बोनस शेअर देण्याचे जाहीर केले आहे.
BSE निर्देशांकात Gretex चे शेअर्स 30.05 रुपये म्हणजेच 4.99 टक्के वाढून 631.70 रुपयेच्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. या कंपनीचे बाजार भांडवल 71.85 कोटी आहे. 27 जुलै 2021 रोजी ग्रेटेक्स कंपनीचा स्टॉक BSE वर लिस्ट झाला तेव्हा त्याची किंमत 176 रुपये होती. एका वर्षात ग्रेटेक्स कंपनीच्या शेअर्सने 29 मार्च 2022 रोजी 160 रुपयेची सर्वकालीन नीचांकी पातळी स्पर्श केली होती. तेव्हापासून या शेअर्सने अल्प कालावधीत 295 टक्के वाढ नोंदवली आहे.
29 मार्च ते 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत, Gretex च्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 3.95 पट अधिक परतावा दिला होता. ग्रेटेक्सचे उद्दिष्ट 2030 पर्यंत IPO, M&A आणि PE सारख्या सेवांसाठी देशातील अग्रणी मर्चंट बँकर बनण्याचे आहे. ही कंपनी शेअर बाजाराशी संबंधित सेवा पुरवते. 4 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीने 8:1 बोनस शेअर्स जाहीर केले आणि ग्रेटेक्सने 13 ऑक्टोबर 2022 ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली. 12 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्स-बोनस वर ट्रेड करत होता. बोनस इश्यू अंतर्गत, कंपनी प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 90,98,760 इक्विटी शेअर्स वाटलं करणार आहे. बोनस शेअर्स चे गुणोत्तर प्रमाण 8:1 आहे, याचा अर्थ कंपनी सध्याच्या 1 इक्विटी शेअरवर पात्र भागधारकांना 8 बोनस शेअर्स मोफत देणार आहे.
2 सप्टेंबर 2022 रोजीच्या नियामक फाइलिंग डेटानुसार, बोनस इक्विटी शेअर्स, एकदा वाटप केल्यानंतर, शेअर धारकांना सध्याच्या इक्विटी शेअर्ससारखेच हक्क असतील आणि कोणत्याही लाभांश आणि इतर कॉर्पोरेट कारवाईत पूर्णपणे सहभागी होण्याचा अधिकार दिला जाईल. 31 मार्च 2022 पर्यंत, Gretex कडे 6.68 लाखांहून अधिक विनामूल्य राखीव आणि 11.08 कोटींहून अधिक सुरक्षा प्रीमियम्स गुंतवणूक राखीव ठेवली आहे. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत कंपनी बोनस शेअर्स वितरीत करेल.
साधारणपणे, सूचिबद्ध कंपनीकडून बोनस शेअर्स केवळ विद्यमान भागधारकांना एका निश्चित प्रमाणात वितरीत केले जातात आणि ते मोफत असतात. बोनस जारी करण्याचे खरे कारण अतिरिक्त किंवा नवीन इक्विटी शेअर्स बाजारात आणण्याचे असते. सूचीबद्ध कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या दर्शनी किमतीवर बोनस शेअर्स जारी केले जातात. बोनस शेअर्सचे फायदे घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी कंपनीचे शेअर्स निर्धारित एक्स-बोनस तारखेच्या एक-दोन दिवस आधी खरेदी करावेत, कारण शेअर्सवरील सेटलमेंटच्या तारखा ‘T+1’ आणि ‘T+2’ अशा असतात. ग्रेटेक्सचा BSE निर्देशांकावर सेटलमेंट कालावधी ‘T+1’ आहे, याचा अर्थ शेअर्स सोमवारी खरेदी केल्यास, ते मंगळवारपर्यंत तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.