15 December 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

Multibagger Stocks | असा शेअर निवडून पैसा वेगाने वाढवा, एका वर्षात 850 परतावा दिला, स्टॉकच नाव नोट करून ठेवा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज आपण ज्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत,ती कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रात उद्योग विस्तार करत आहे. या सोलर एनर्जी कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 850 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षभरापूर्वी जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्स मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य सात लाख रुपये झाले असते. मागील एका महिन्यात, या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 150 टक्के नफा कमावून दिला आहे.

मल्टीबॅगर स्टॉक्स :
आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत, त्या कंपनीचे नाव आहे, “सोलेक्स एनर्जी लिमिटेड”. हा स्टॉक मागील बऱ्याच दिवसापासून ​​उ अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. हा स्टॉक अशा मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे, ज्याने भारतीय शेअर बाजारात मागील एका वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक NSE SME निर्देशांकावर 5 टक्क्यांनी वाढला होता. स्टॉक ने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटला स्पर्श केला होता, आणि प्रती शेअर किंमत 463.05 च्या पातळीवर पोहोचली होती. आठवड्याच्या सुरुवातीला एसएमई निर्देशांकावर हा स्टॉक अप्पर सर्किटवर गेला होता, आणि दिवसा अखेर शेअर 441 रुपये प्रति शेअर किमतीवर क्लोज झाला. हा सोलर एनर्जी स्टॉक सातत्याने अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. आणि सध्या स्टॉक सर्वकालीन उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत आहे.

सोलेक्स एनर्जी शेअरचा इतिहास :
मागील एका महिन्यात सोलेक्स एनर्जी या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या भागधारकांना 150 टक्केचा भरघोस नफा कमावून दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी हा मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉक 100 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, तो सध्या वाढून 463 रुपये वर ट्रेड करत आहेत. एवढ्या भरघोस वाढीमुळे गुंतवणूकदारांनी प्रती शेअर 360 रुपये कमावले आहेत. त्याचप्रमाणे, एका वर्षापूर्वी हा स्मॉल-कॅप मल्टीबॅगर स्टॉक 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, सध्या स्टॉकची किंमत प्रती शेअर 463 पर्यंत गेली आहे. या कालावधीत सोलेक्स एनर्जीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 850 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम :
Solex solar Energy चा चार्ट पॅटर्न पहिला तर असे दिसेल की, जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 लाखवरून वाढून आज 2.50 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या सोलर कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1 लाख वरून वाढून आज 4.60 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, 2022 च्या सुरुवातीला ज्यांनी या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यांना आता 6.90 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिवसा अखेर सोलेक्स एनर्जीचे बाजार भांडवल 370 कोटीं रुपये नोंदवले गेले होते. मंगळवारच्या एका ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीच्या बाजार भांडवलात 18 कोटीची भर पडली.हा एक स्मॉल-कॅप स्टॉक असून, कंपनीचे बाजार भांडवल 352 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 42.50 रुपये होती. 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी किंमत 463.05आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉक ची ट्रेडिंग व्हॉल्यूम फक्त 4,000 नोंदवण्यात आली होती. शेअर ची ट्रेडिंग व्हॉल्यूम वाढली तर शेअरच्या किमतीत अस्थिरता येऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Solex Energy share price return on investment on 22 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x