19 April 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

ढिसाळ बँक व्यवस्थापन | अजून एका सहकारी बँकेचं लायसन्स रद्द

RBI cancel license, Vasantdada Sahakari Bank

उस्मानाबाद, १२ जानेवारी: महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचं लायसन्स आरबीआयनं रद्द केलंय. उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केलीय. बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचंही आरबीआयनं म्हटलंय. विशेष म्हणजे बँकेचं लायसन्स रद्द झालं तर कोणत्याही ग्राहकाची 5 लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. ती त्यांना परत मिळण्याची गॅरंटी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या 99 टक्के ग्राहकांचा पैसा सुरक्षित आहे.

या कारवाईमुळे बँकेला आजपासून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँकेने एक प्रेसनोट रिलीज करून वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

कालपासून म्हणजेच ११ जानेवारीपासून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ही माहिती देताना बँकेचा परवाना रद्द करण्याची अनेक कारणंही दिली आहेत. बँकेची सध्याची वित्तीय स्थिती पाहता ही बँक ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात असमर्थ आहे, असं एक प्रमुख कारण आरबीआयने दिलं आहे. २०१७मध्ये या बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घालूनही बँकेने वित्तीय स्थिती सुधारली नाही. त्यामुळे बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकेत हजारो ठेवीदारांच्या लाखो ठेवी आहेत.

 

News English Summary: RBI cancels license of another bank in Maharashtra The RBI has announced that the license of Osmanabad’s Vasantdada Nagari Sahakari Bank is being revoked. The RBI also said that in the current scenario, the bank is unable to pay customers or make transactions. In particular, up to Rs 5 lakh is safe for any customer if the bank’s license is revoked. She is guaranteed to get them back. According to him, 99 per cent of the customers of Osmanabad’s Vasantdada Nagari Sahakari Bank are safe.

News English Title: RBI cancel license of Vasantdada Sahakari Bank news updates.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x