31 May 2024 6:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 31 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या LIC Share Price | कमाईची मोठी संधी! LIC स्टॉक अल्पावधीत देईल 30 टक्के परतावा, ब्रोकरेजचा रिपोर्ट NBCC Share Price | सरकारी शेअर खिसा पैशाने भरतोय, 6 महिन्यात पैसे दुप्पट, खरेदी करा PSU स्टॉक IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! कंपनी प्रचंड चर्चेत, स्वस्त शेअर खरेदी करणार? Salary EPF Money | नोकरदारांनो! तुमच्या पगारातून EPF कापला जातोय? झटपट पैसे मिळतील, अपडेट जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या
x

WPIL Share Price | या शेअरने 1 महिन्यात 80 टक्के परतावा दिला, स्टॉक मध्ये वाढ होण्याचे नेमकं कारण काय?

WPIL Share Price

WPIL Share Price | डब्ल्यूपीआयएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी 8.88 टक्के वाढीसह 2,220.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 2,038.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीने नुकताच केलेल्या घोषणेनुसार त्यांना 1.225 कोटी रुपयांच्या ऑर्डरसाठी मध्य प्रदेश जल निगमकडून स्वीकृती पत्र प्राप्त झाले आहे. यापूर्वी 21 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,949 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डब्ल्यूपीआयएल लिमिटेड कंपनीने सांगितले की, हा LoA 1,225 कोटी रुपयांच्या बेबास सुनार 2 कुटणे, राजनगर लोअर नर्मदा आणि मान डॅम मल्टी व्हिलेज योजनांसाठी 10 वर्ष कालावधीसाठी अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम, चाचणी, कमिशनिंग, आणि ऑपरेशन व देखभाल यासह टर्नकी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी देण्यात आला आहे. हा प्रकल्प कंपनीला फक्त 24 महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | WPIL Share Price | WPIL Stock Price | BSE 505872)

एका वर्षात 130 टक्के परतावा :
मागील एका महिन्यात डब्ल्यूपीआयएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे . त्याच वेळी मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 130 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त डिसेंबर तिमाही निकालांमुळे तेजी पाहायला मिळत आहे. तर या कंपनीने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत 83.70 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. या कंपनीच्या महसुलात वार्षिक 459 टक्के वाढ झाली आहे.

डिसेंबर 2022 च्या तिमाहीत डब्ल्यूपीआयएल लिमिटेड कंपनीच्या महसुलात 106 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे. तर डब्ल्यूपीआयएल कंपनी पंपांच्या पुरवठ्यापासून ते टर्नकी प्रकल्पांच्या बांधकामापर्यंत सर्व प्रकारच्या सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीचा महसूल वार्षिक 106 टक्क्यांच्या वाढीसह 507.2 कोटी रुपयेवर गेला आहे. त्याचवेळी कंपनीचा या तिमाहीत एबिटा मार्जिन 732 bps ने वाढून 20.9 टक्केच्या वर गेला आहे.

व्यापार वाढीचे कारण : WPIL कंपनीच्या महसुलात मजबूत वाढ मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि टर्नकी प्रकल्प यामुळे पाहायला मिळत आहे. कंपनीचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय वार्षिक 64 टक्क्यांच्या वाढीसह 239.6 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी कंपनीचा टर्नकी प्रकल्पांमधून मिळणारा महसूल वार्षिक 180 टक्क्यांच्या वाढीसह 254.3 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | WPIL Share Price 505872 stock market live on 06 March 2023.

हॅशटॅग्स

WPIL Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x