
Multibagger Stocks | रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 900 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. Rama Steel Tubes Share Price
2020 मध्ये कोविड महामारी दरम्यान रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर आले होते. आता या कंपनीचे शेअर्स 39 रुपये किमतीवर आले आहे. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 2.61 टक्के घसरणीसह 39.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
22 फेब्रुवारी 2019 रोजी रामा स्टील ट्यूब्स कंपनीचे शेअर्स 3.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 15 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 39.10 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 928 टक्के नफा कमावून दिला आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 50.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 26.45 रुपये होती.
नुकताच रामा स्टील ट्यूब्स कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसन्या तिमाहीत रामा स्टील ट्यूब्स कंपनीने 211.45 कोटी रुपये सेल्स नोंदवली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 244.66 कोटी रुपयेची सेल्स केली होती. म्हणजेच मागील एका वर्षात कंपनीच्या विक्रीत 13.57 टक्के घसरण झाली आहे.
आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत रामा स्टील ट्यूब्स कंपनीचा नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 32.12 टक्के वाढून 5.70 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 4.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा EBITDA 41.73 टक्के वाढून 13.62 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. डिसेंबर 2022 मध्ये या कंपनीचा EBITDA 9.61 कोटी रुपये नोंदवला गेला होता. रामा स्टील ट्यूब कंपनीच्या शेअर्सचा EPS या तिमाहीत 0.08 टक्केवर आला आहे. जो मागील वर्षी डिसेंबर तिमाहीत 0.50 टक्के होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.