 
						My EPF Money | केंद्राने UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमच्या घोषणेनंतर ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आशेला लावून ठेवलं आहे. कारण की, ईपीएफओ अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटपर्यंत चांगला फंड जमा करता यावा यासाठी पगारवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नेमकं काय आहे या प्रस्तावात पाहूया.
लवकरच वाढवण्यात येणार पगारवाढीची सीमा :
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 सप्टेंबर 2014 सालापासून ईपीएसकरीता पगाराची सीमा 15,000 रुपयांपर्यंत करण्यात आली होती. अजूनही ही सीमा एवढीच आहे. परंतु लवकरच केंद्र सरकार या नियमांमध्ये बदल करून कर्मचाऱ्यांना 15 नाही तर, 21,000 हजार रुपये दरमहा पगार करण्याचा विचार करत आहे.
या सर्वासाठी एप्रिल महिन्यातच प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. लवकरात लवकर वित्त मंत्रालय या गोष्टीचा आढावा घेऊन आणि विचार करणे निर्णय सुनावणार आहेत. अनेक खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे.
15000 हून थेट 21,000 :
प्रस्तावामध्ये नमूद केल्याप्रमाणे पंधरा हजारांची सीमा 21000 पर्यंत करण्यात येणार आहे. जेणेकरून खाजगी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीत वाढ तर होईलच सोबतच ईपीएफ खात्यामध्ये देखील योगदान वाढीस लागेल. असं केल्याने प्रत्येक खाजगी कर्मचाऱ्याला रिटायरमेंटपर्यंत एक चांगला फंड जमा करता येईल.
अशा पद्धतीने होईल कर्मचाऱ्यांना फायदा :
पगार वाढ झाल्याबरोबर प्रत्येक कर्मचारी ईपीएस आणि ईपीएफ योजनांमध्ये येण्यास पात्र ठरतील. याचाच अर्थ असा की, प्रत्येक खाजगी कर्मचाऱ्याला रिटायरमेंटनंतर आधीच्या कॅल्क्युलेशनपेक्षा जास्त रक्कम मिळेल. त्यामुळे वेतन सीमा वाढवल्याबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना जास्तीचा लाभ घेता येणार आहे.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		