5 May 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या
x

Multibagger Dividend | 45 टक्के परतावा देणाऱ्या या शेअरच्या गुंतवणूदारांना कंपनी 2909 कोटी रुपयांचा लाभांश वाटप करणार, शेअरमध्ये तेजी

Multibagger Devidend

Multibagger Dividend| एनटीपीसीने 2022 मध्ये 20 जानेवारी रोजी प्रति शेअर 4 रुपये अंतरिम लाभांश जाहीर देण्याचे जाहीर केले होते. यानंतर पुन्हा 20 मे रोजी प्रति शेअर 3 रुपये लाभांश जाहीर केला. हा लाभांश 2021-22 या आर्थिक वर्षासाठी होता.

भारतातील सर्वात मोठी ऊर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसीने आपल्या भागधारकांना लाभांश म्हणून 2908.99 कोटी रुपये वितरीत केले आहेत. एनटीपीसीने 20 जानेवारी रोजी 4 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला. आणि त्याची एक्स-डिव्हिडंड तारीख 3 फेब्रुवारी 2022 होती. यानंतर, 20 मे रोजी 3 रुपये प्रति शेअर लाभांश पुन्हा वितरीत करण्यात आला, ज्याची लाभांशची रेकॉर्ड तारीख 10 ऑगस्ट 2022 होती.

हे पेमेंट 2021-22 या कालावधीसाठी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यावेळी कंपनीने मागील आर्थिक वर्षाचा अंतिम लाभांशही जाहीर केला होता. या लाभांशासह, मागील आर्थिक वर्षात दिलेला एकूण लाभांश 6787 कोटी रुपये होता. हा लाभांश 2021-22 मध्ये कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्याच्या 42 टक्के इतका होता.

सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनीच्या शेअर्सची स्थिती :
मागील ट्रेडिंग सेशन मध्ये NSE वर NTPC च्या शेअर्समध्ये 0.12 टक्क्यांची पडझड झाली होती. दिवसाखेर शेअर 166.40 रुपये किमतीवर बंद झाले होते. मागील 1 आठवड्यात स्टॉकमध्ये 2.21 टक्क्यांची वाढ झाली आहे. एनटीपीसीच्या शेअर्सच्या किमतीत एका महिन्यात 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. NPTC ने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा मिळवून दिला होता. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकने 168 रुपयेची किंमत पातळी गाठली आहे. ही किंमत त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या खूप जवळ आहे. त्याच वेळी, त्याची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 112.40 रुपये आहे. तज्ज्ञांनी एनटीपीसीचे शेअर्स भरभरून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किमतीत कंपनीचे बाजार भांडवल 1,61,547 कोटी रुपये आहे.

जून तिमाही परतावा :
जून तिमाहीत NTPC कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या तिमाहीशी तुलना करता, 2,592 कोटींच्या तुलनेत 3857 कोटी रुपये नफा कमावला आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न तब्बल 43,177 कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 29,888 कोटी रुपये होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Dividend declared by NTPC limited in 14 September 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Devidend(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x