
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) भारतातील नोकरदार व्यक्तींच्या पीएफ खात्यात केलेल्या योगदानाचे व्यवस्थापन करण्यासाठी जबाबदार आहे. कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही या खात्यात योगदान देतात. ईपीएफओ फक्त त्या खात्यांमध्ये व्याज हस्तांतरित करते ज्यामध्ये ईपीएफ चे योगदान वेळेवर केले गेले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश जारी केला होता की, जर एखादी कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात वेळेत पैसे हस्तांतरित करण्यात अपयशी ठरली, ज्यामुळे कर्मचाऱ्याचे व्याज बुडाले तर कंपनीला त्याची भरपाई द्यावी लागेल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायद्याच्या कलम १४ ब आणि ७ क्यू नुसार, एखाद्या कंपनीला आपल्या ईपीएफओ खात्यात विलंबाने योगदान दिल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई कर्मचाऱ्याला द्यावी लागते. नुकसान भरपाईची रक्कम किती उशीरा योगदान दिले यावर अवलंबून असेल आणि ते योगदानाच्या 100 टक्क्यांपर्यंत असू शकते.
कंपनीला हा दंड थकबाकीच्या स्वरूपात कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करावा लागेल आणि थकित रकमेवर १२ टक्के दराने व्याज भरावे लागेल. दोन महिन्यांपर्यंत च्या विलंबासाठी ५ टक्के, २ ते ४ महिन्यांच्या विलंबासाठी १० टक्के, ४ ते ६ महिन्यांच्या विलंबासाठी १५ टक्के आणि ६ महिन्यांपेक्षा जास्त विलंब झाल्यास २५ टक्के दंडाची रक्कम आकारण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्याच्या पगाराचा एक भाग, त्यांच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के इतका, पीएफ खात्यात जमा केला जातो आणि नियोक्ता या योगदानाएवढ्या खात्यात गुंतवणूक करतो. एम्प्लॉयरच्या योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत जमा केली जाते, तर उर्वरित ३.६७ टक्के रक्कम ईपीएफओ खात्यात जमा केली जाते. वैद्यकीय आणीबाणी, मुलाचे लग्न किंवा घर बांधणे यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत पीएफ खात्यात जमा झालेले पैसे काढता येतात. निवृत्तीनंतर एकरकमी रक्कम म्हणून एकूण अनामत रक्कम काढता येते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.