 
						Nandan Denim Share Price | ‘नंदन डेनिम्स लिमिटेड’ या टेक्सटाईल कंपनीच्या शेअर्समध्ये काल तुफानी तेजी पाहायला मिळाली. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.98 टक्के वाढीसह 22.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 20 टक्के वाढला होता. मागील पाच दिवसांत ‘नंदन डेनिम्स लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 48 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. (Nandan Denim Limited)
या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे दोन प्रमुख कारण सामोरे आले आहेत. शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे एक कारण म्हणजे कंपनी लार्ज कॅप श्रेणीत येत नाही. कंपनीने सेबीला कळवले की, आम्ही मोठे कॉर्पोरेट कंपनी नसून स्मॉल कॅप व्यापार हाताळत आहोत. दुसरे कारण म्हणजे भारत सरकारने असा अंदाज वर्तवला आहे की, भारतीय वस्त्रोद्योग पुढील आठ वर्षांत तीन पट वाढणार आहे. आणि 2030 पर्यंत सध्याच्या 100 बिलियन डॉलर्सवरून वाढून 300 बिलियन डॉलर्सपर्यंत जाणार आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘नंदन डेनिम लिमिटेड’ ही कंपनी प्रामुख्याने डेनिम, यार्न आणि शर्टिंग इत्यादी फॅब्रिक्सचे उत्पादन आणि विक्री करण्याचे काम करते. कंपनीचे बहुसंख्य शेअर्स कंपनीच्या प्रवर्तकांनी धारण केले आहेत. त्यांच्या कडे जवळपास 64.74 टक्के शेअर्स आहेत. उर्वरित शेअर्स FII, DII आणि सामान्य गुंतवणूकदारांनी धारण केले आहेत.
शेअर्सने दिला मल्टीबॅगर परतावा :
‘नंदन डेनिम्स लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. तथापि मागील एका वर्षात ‘नंदन डेनिम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 65.27 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 69.90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 15.01 रुपये होती. नंदन डेनिम्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 326.93 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		