15 December 2024 12:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Nykaa Share Price | नायका शेअर्सची पडझड थांबेना, स्टॉकबाबत तज्ञांनी दिली नवी टार्गेट प्राईस, गुंतवणुकदारांनी काय करावे?

Nykaa Share Price

Nykaa Share Price | ‘नायका’ कंपनीच्या शेअर ने सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना हैराण केले आहे. गुंतवणुकदार अक्षरशः स्टॉक हिरव्या निशाणी वर वाट पाहतात आणि संधी मिळताच स्टॉक विकून बाहेर पडतात. असेच काहीसे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाहायला मिळाले होते. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.70 टक्के घसरणीसह 131.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. प्री- IPO गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी संपल्यापासून ‘नायका’ कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. (Fsn E-Commerce Ventures Ltd)

सौंदर्य प्रसाधन आणि पर्सनल केअर श्रेणींतील वाढत्या मागणीमुळे ‘नायका’ कंपनीच्या महसुलात वाढ होण्याची शक्यता आहे. ‘नायका’ कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत मजबूत निकाल जाहीर केले होते. आर्थिक वर्ष 2022-2023 च्या चौथ्या तिमाहीत सौंदर्य प्रसाधन आणि पर्सनल केअर श्रेणीमधील मजबूत मागणीमुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये महसूल वाढ होण्याची शक्यता आहे.

नायका शेअरची किंमत  – What is the Share Price of Nykaa – FSN E-Commerce Ventures Ltd.?
कोणत्याही शेअरची किंमत अस्थिर असते आणि वेगवेगळ्या घटकांमुळे दिवसभर बदलत राहते. नायका म्हणजे एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडच्या शेअरची किंमत 6 एप्रिल 23 रोजी136.65 रुपयांवर क्लोज झाली आहे.
52 आठवड्यांचा उच्चांकी / नीचांकी दर (What is the 52 Week High and Low of Nykaa – FSN E-Commerce Ventures Ltd.?)
52 आठवड्यांचा उच्चांकी / नीचांकी दर हा सर्वात जास्त आणि सर्वात कमी किंमत असते, ज्यावर नायका स्टॉकने त्या कालावधीत व्यवहार केला आहे आणि तो तांत्रिक सूचक मानला जातो. नायका शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आणि नीचांकी स्तर 6 एप्रिल 23 रोजी 315.44 रुपये आणि 120.70 रुपये आहे.

शेअरची कामगिरी :
‘नायका’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 56.02 टक्के कमजोर झाले आहेत. मागील सहा महिन्यांत ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 38.52 टक्के कमजोर झाले आहेत. प्री आयपीओ गुंतवणूकदारांचा लॉक इन कालावधी संपल्यापासून ‘नायका’ कंपनीच्या शेअर्समध्ये मंडी वाढत चालली आहे. कंपनीच्या व्यवस्थापन स्तरावरही मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. नुकतेच पाच बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. यामध्ये मनोज गांधी चीफ कमर्शियल ऑपरेशन्स ऑफिसर, गोपाल अस्थाना, मुख्य व्यवसाय अधिकारी फैशन विभाग-विकास गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी- घाऊक व्यवसाय, यांनी आपले पद सोडले आहेत. ‘नायका’ कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 1125 रुपये निश्चित करण्यात आली होती. ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 2054 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले होते.

शेअरची उलाढाल :
‘नायका’ शेअर प्राइस आउटलक वर चॉईस ब्रोकिंग फर्मचे कार्यकारी तज्ञ म्हणतात की, ‘नायका’ कंपनीच्या शेअर्सला 145 ते 150 च्या रेंजमध्ये प्रतिरोध पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स 125 रुपये ते 130 रुपये प्रति शेअर या किमतीवर ट्रेड करु शकतात. चार्ट पॅटर्नवर हा स्टॉक कमजोरीचे संकेत देत आहे. मात्र तज्ञ ‘नायका’ कंपनीच्या शेअर धारकाना स्टॉक बाउन्स बॅकवर बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांनी 125 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price on 07 April 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x