
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये (NSE: NBCC) आला आहे. केंद्र सरकारच्या मागासवर्गीय कल्याण विभागाकडून एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला मोठे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत. एनबीसीसी कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टची किंमत ११२ कोटी रुपये आहे. गेल्या दोन वर्षांत एनबीसीसी शेअरने 263% परतावा दिला आहे. एनबीसीसी कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 139.90 रुपये होता. तर, ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४२.५५ रुपये होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
कंपनीला मिळालेली कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळालेला एक कॉन्ट्रॅक्ट २२ कोटी रुपयांचा आहे. एनबीसीसी कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टनुसार मलकानगिरी येथील बारापाडा हायस्कूलचे रूपांतर उच्च माध्यमिक शाळेत करण्यात येणार आहे. याशिवाय एनबीसीसी कंपनीला अजून 6 कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. कंपनीला मिळालेल्या प्रत्येक ऑर्डरची किंमत प्रत्येकी १५ कोटी रुपये आहे. दुसऱ्या तिमाहीत एनबीसीसी कंपनीचा निव्वळ नफा 52.8 टक्क्यांनी वाढून 125.1 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर सप्टेंबर 2024 तिमाहीत एनबीसीसी कंपनीचा महसूल 19.4 टक्क्यांनी वाढून 2458.7 कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 2085.5 कोटी रुपये होता.
शेअर २६३ टक्क्यांनी वधारला
मागील १ महिन्यात हा शेअर 12.85% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 9.85% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 99.11% परतावा दिला आहे. मागील २ वर्षात शेअरने 264.45% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 63.83% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.