15 December 2024 3:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Dish TV Share Price Today | 15 रुपयाचा शेअर मागील 6 महिन्यापासून तुफान तेजीत, गुंतवणूकदारांचे खिसे पैशाने भरतोय

Dish TV Share Price

Dish TV Share Price Today | शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव असताना ‘डिश टीव्ही’ कंपनीच्या शेअरमध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. ‘डिश टीव्ही’ ही कंपनी ‘DTH ऑपरेटर’ आहे. काल ट्रेडिंग दरम्यान डिश टीव्ही कंपनीचे स्टॉक 15 टक्के पेक्षा वधारले होते. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी डिश टीव्ही कंपनीचे शेअर्स 14.23 टक्के वाढीसह 15.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Dish TV Limited)

20 जून 2022 रोजी डिश टीव्ही कंपनीचे शेअर्स 10.23 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. डिसेंबर 2022 मध्ये डिश टीव्ही कंपनीच्या स्टॉकने 24.45 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल.2877.88 कोटी रुपये आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
डिश टीव्ही कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.65 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.60 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4.57 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6.29 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील पाच वर्षात डिश टीव्ही कंपनीचे शेअर्स 79.02 टक्के घसरले आहेत.

शेअरहोल्डिंग पॅटर्न :
मार्च 2023 च्या तिमाहीमध्ये डिश टीव्हीने जारी केलेल्या आकडेवारी नुसार कंपनीचे 4.04 टक्के भाग भांडवल कंपनीचे प्रवर्तक होल्ड करत आहेत. तर 95.96 टक्के भाग भांडवल सार्वजनिक गुंतवणुकदार होल्ड करत आहेत. कंपनीच्या प्रवर्तक सुशीला देवी यांनी 0.03 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

तिमाही आर्थिक कामगिरी :
‘डिश टीव्ही’ कंपनीला मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 2.85 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. कंपनीला महसुलात घट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा प्रसार कमी झाल्यामुळे गा तोटा सहन करावा लागला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न 22.31 टक्क्यांनी कमी होऊ 552.09 कोटी रुपयेवर आले आहे. मागील तिमाहीत डिश टीव्ही कंपनीचा एकूण खर्च 567.16 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dish TV Share Price Today on 22 April 2023.

हॅशटॅग्स

Dish TV Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x