20 May 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल
x

Virgo Global Share Price Today | 64 पैशाच्या पेनी शेअरची कमाल, 1 वर्षात 1165% परतावा देत केलं मालामाल, सध्या 8 रुपयांना मिळतोय

Virgo Global Share Price

Virgo Global Share Price Today | शेअर बाजारात अशी एक धारणा निर्माण झाली आहे की, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते. मात्र हे खरे नाही. तुम्ही जर दर्जेदार शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही जबरदस्त कमाई करु शकता. आज लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. (Virgo Global Limited)

या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अद्भूत परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करतोय, तिचे नाव आहे, ‘विर्गो ग्लोबल’. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.12 टक्के घसरणीसह 8.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुंतवणुकदार झाले श्रीमंत :
मागील एका वर्षात ‘विर्गो ग्लोबल’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,165.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 67 पैशांवरून वाढून 8.48 रुपयांवर पोहचला आहे. या वर्षी YTD आधारे ‘विर्गो ग्लोबल’ कंपनीचे शेअर्स 28.92 टक्के वर गेले आहेत. मागील सहा महिन्यांत ‘वर्गो ग्लोबल’ कंपनीचे शेअर्स 137.92 टक्के वाढले आहेत.

या काळात शेअरची किंमत 3.56 रुपयांवरून वाढून 8.07 रुपयेवर पोहचली आहे. मागील.एका महिन्यात ‘विर्गो ग्लोबल’ कंपनीचे शेअर्स 36.83 टक्के वाढले आहे. ‘विर्गो ग्लोबल’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 64 पैसे होते. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 13.53 रुपये होती.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
‘विर्गो ग्लोबल’ कंपनी मुख्यतः संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, संगणक प्रणालींचे उत्पादन, व्यापार आणि देखभाल करण्याचे काम करते. ही कंपनी डेटा प्रोसेसर, प्रोग्राम डिझाइन आणि हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर पॅकेजेस आणि सर्व प्रकारच्या टॅब्युलेटिंग मशीनची खरेदी-विक्री करते. या कंपनीचे बाजार भांडवल 8.90 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Virgo Global Share Price today on 22 April 2023

हॅशटॅग्स

Virgo Global Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x