19 January 2025 4:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, ऑर्डरबुक मजबूत झाली, 2 वर्षात दिला 450% परतावा - Marathi News

Highlights:

  1. NBCC Share PriceNSE: NBCC – एनबीसीसी इंडिया कंपनी अंश
  2. 1260 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली
  3. मागील 1 वर्षांत 195% परतावा दिला
NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या (NSE: NBCC) शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 450 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीला 75 कोटी रुपये मूल्यांची वर्क ऑर्डर मिळाली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)

या कंपनीला भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकाम आणि विकासासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एनबीसीसी इंडिया कंपनीला हे पायाभूत सुविधांचे काम EPC मोडमध्ये पूर्ण करायचे आहे. या ऑर्डरमध्ये एनबीसीसी इंडिया कंपनी पायाभूत सुविधांची कामे, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम मोडमध्ये पूर्ण करणार आहे.

1260 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली
एनबीसीसी इंडिया कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी HSCC इंडिया लिमिटेडला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1260 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत एचएससीसी इंडिया कंपनीला बिहारमधील दरभंगा येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या स्थापनेचे काम देण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के वाढीसह 171.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 1 वर्षांत 195% परतावा दिला
30 सप्टेंबर 2022 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 30.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 सप्टेंबर 2024 रोजी हा स्टॉक 169.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 195 टक्के परतावा मिळवून दिला आहे.. 26 सप्टेंबर 2023 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 57.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 105 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 209.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.71 रुपये होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. याच काळात कंपनीचे शेअर्स 114.90 रुपयेवरून वाढून 169 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x