12 December 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

NBCC Share Price | शेअरची किंमत 82 रुपये! अल्पावधीत दिला 100 टक्के परतावा, खरेदी करावा?

NBCC Share Price

NBCC Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.74 टक्के वाढीसह 84.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे.

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला 1,469 गोदामे आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी 1,500 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 82.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

14 डिसेंबर 2023 रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 84.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100.48 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 41 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 15,006.60 कोटी रुपये आहे.

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने भारतातील विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ आणि प्राथमिक कृषी सहकारी संस्थाकडून मोठ्या ऑर्डर मिळवल्या आहेत. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, नोव्हेंबर 2023 मध्ये कंपनीने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया सोबत एक सामंजस्य करार केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE 15 December 2023.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x