18 May 2024 7:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Siyaram Recycling Industries IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअरची प्राईस बँड 46 रुपये, पहिल्याच दिवशी 60% कमाई होईल

Siyaram Recycling Industries IPO

Siyaram Recycling Industries IPO | सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज या ब्रास प्लंबिंग आणि सॅनिटरी घटक बनवणाऱ्या कंपनीचा IPO गुरुवार दिनांक 14 डिसेंबर रोजी लाँच करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 18 डिसेंबर 2023 पर्यंत खुला असेल. सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

सियाराम रिसायकलिंग कंपनीचा आयपीओ एसएमई आयपीओ आणि बुक-बिल्ट इश्यू असेल. सियाराम रीसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 28 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. IPO किंमत बँडच्या तुलनेत ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 60.87 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे.

सियाराम रिसायकलिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड 43 रुपये ते 46 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. 14 डिसेंबर रोजी IPO लाँच झाल्यावर गुंतवणूकदारांनी हा IPO स्टॉक 8.16 पट अधिक सबस्क्राईब केला होता. सियाराम रिसायकलिंग कंपनीचा IPO स्टॉक 21 डिसेंबर 2023 शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. या IPO मध्ये कंपनीने 49.92 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले आहे. IPO च्या माध्यमातुन कंपनीने 22.96 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी केली आहे.

सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 3,000 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 138,000 रुपये जमा करावे लागतील. या कंपनीच्या आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून हेम सेक्युरीटिजला नियुक्त करण्यात आले आहे. तर कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस कंपनीला आयपीओ रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या कंपनीच्या प्रवर्तक गटात द्वारकाधीश व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, रामगोपाल ओच्छावलाल माहेश्वरी, भावेश रामगोपाल माहेश्वरी आणि मधु रामगोपाल माहेश्वरी सामील आहेत. कंपनी IPO मधून जमा होणारा पैसा कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंवर खर्च करणार आहे.

सियाराम रिसायकलिंग इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः पितळ उत्पादनाचा व्यवसाय करते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 3.22 कोटी रुपये होता. जो आता 2023 मध्ये वाढून 7.65 कोटी रुपयेवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल संकलन 426.44 कोटी रुपयेवरून वाढून 497.86 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Siyaram Recycling Industries IPO 15 December 2023.

हॅशटॅग्स

Siyaram Recycling Industries IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x