 
						NBCC Share Price | सोमवार 28 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 6.36 टक्के वाढून 93.50 रुपयांवर पोहोचला होता. मल्टिबॅगर एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी (NSE: NBCC) शेअर तेजीत येण्याचे संकेत मिळत आहेत. कारण कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली आहे. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.35 टक्के वाढून 93.64 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
१७२६ कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला गोवा सरकारकडून १७२६ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कंपनीने याबाबत स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला पुनर्विकास प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे आहेत. या बातमीनंतर एनबीसीसी इंडिया शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे.
नवीन कॉन्ट्रॅक्टबद्दल माहिती
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला मिळालेल्या १७२६ कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये गोवा पणजी येथील जुंटा हाऊस, सर्किट हाऊसचा पुनर्विकास, गव्हर्नमेंट गॅरेज, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, मिनी कन्व्हेन्शन सेंटर आणि शासकीय क्वार्टर्सचा पुनर्विकास या कामांचा समावेश आहे.
1 वर्षात पैसे दुप्पट
मागील १ वर्षात एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांब 109% परतावा दिला आहे. त्यामुळे एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक झाले आहेत.
शेअरने दिलेला परतावा
मागील १ महिन्यात हा शेअर 21.78% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 109.03% परतावा दिल आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 274% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 71.34% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		