3 May 2024 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

INOX Green Energy IPO | गौतम अदाणींची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, शेअरची किंमत 61-65 रुपये दरम्यान

INOX Green Energy IPO

INOX Green Energy IPO | सध्या शेअर बाजारात IPO चा सिजन सुरू झाला आहे. एकावर एक असे जबरदस्त कंपनीचे IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी आले आहेत. जर तुम्ही सध्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग/IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक मजबूत संधी मिळणार आहे. शुक्रवारी 11 नोव्हेंबर 2022 रोजी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस/IGESLचा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO मध्ये एका शेअरची किंमत 61-65 रुपये दरम्यान असेल असे निश्चित करण्यात आले आहे.

740 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य :
INOX ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या IPO द्वारे शेअर बाजारातून 740 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. या IPO मध्ये कंपनी 370 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी करणार असून त्याचे दर्शनी मूल्य प्रत्येकी 10 रुपये असेल. INOX ग्रीन एनर्जी कंपनीची मूळ कंपनी आयनॉक्स विंड या IPO इश्यूद्वारे 370 कोटी रुपयांचे शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. कंपनी IPO मधून उभारलेले पैसे नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरणार आहे.

आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीची स्थापना 2012 साली झाली होती. आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनी ही भारतातील सर्वात आघाडीची पवन ऊर्जा ऑपरेटर आणि देखभाल सेवा सुविधा देणारी कंपनी आहे. आयनॉक्स विंड कंपनीची उपकंपनी असलेल्या ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचा व्यवसाय गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये विस्तारलेला आहे. आयनॉक्स कंपनी ही GFL ग्रुपचा एक भाग आहे. आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसमध्ये सध्या आयनॉक्स विंड कंपनीची 93.84 टक्के मालकी आहे. अलीकडे, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीने भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जीला तीन विशेष युनिट्समधील संपूर्ण इक्विटी वाटा विकला आहे.

31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात INOX कंपनीने 190.23 कोटी रुपयांचा एकूण महसुल कमावला होता. त्या काळात कंपनीचा एकूण निव्वळ तोटा 4.95 कोटी रुपये होता. 30 जून रोजी संपलेल्या तिमाही कालावधीत कंपनीने 63.13 कोटी रुपयांचा महसुल कमावला मात्र कंपनीचा निव्वळ तोटा 11.58 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| INOX Green Energy IPO Ready to launch soon on stock market on 08 November 2022.

हॅशटॅग्स

#Inox Green Energy IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x