 
						NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 130.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 137.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण पहायला मिळत होती. अवघ्या सात दिवसात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 टक्के घसरली होती. सध्या एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली आहे. कंपनीने आपल्या तिमाही नफ्यात मजबूत वाढ नोंदवली आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 59 टक्के वाढीसह 113.56 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीने 71.49 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत एनबीसीसी इंडिया कंपनीने 2,471.51 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 2,191.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-डिसेंबर 2023 या पहिल्या नऊ महिन्यांत एनबीसीसी इंडिया कंपनीने 272.88 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच काळात कंपनीने 164.37 कोटी रुपये नफा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत एनबीसीसी इंडिया कंपनीने 6,566.41 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी याच काळात कंपनीने 6,118.38 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
एनबीसीसी इंडिया ही कंपनी मुख्यतः प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करते. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 16 टक्के घसरले होते. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 45 टक्के वाढली होती. मागील सहा महिन्यांत एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे.
YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 60 टक्के वाढवले आहे. मागील एका वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 280 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 176.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 176.50 रुपये होती. एनबीसीसी इंडिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 23,535 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		