
NBCC Share Price | एनबीसीसी या सरकारी बांधकाम कंपनीचे शेअर्स मंगळवारी 3 टक्के वाढीसह 164.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनबीसीसी कंपनीला ग्रिड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने 70 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
या ऑर्डर अंतर्गत कंपनीला नवी दिल्ली येथे ग्रिड स्थापन करण्याचे, तसेच ग्रँड-रुई येथे फर्निचर, फिट आउट वर्क केबलिंग आणि इतर पायाभूत कामांसह अंतर्गत कामांचे नियोजन, डिझाइन आणि अमलबजावणी संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी एनबीसीसी स्टॉक 1.31 टक्के घसरणीसह 156.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
एनबीसीसी कंपनीला 5 जून रोजी केंद्र सरकारच्या आरोग्य योजना विभाग, ओडिशा राज्य सहकारी बँक, नवोदय विद्यालय, युनियन बँक ऑफ इंडिया, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच इतर ग्राहकांकडून 491.45 कोटी रुपये मूल्याचे बांधकाम कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. 11 जून रोजी एनबीसीसी कंपनीला कोची मेट्रो रेल लिमिटेड, दिल्ली युनिव्हर्सिटी, ऑइल इंडिया आणि इंन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरीज ऑफ इंडिया कंपनीकडून 878.17 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या होत्या.
एनबीसीसी कंपनीला कोची मेट्रो रेल्वेने दिलेल्या ऑर्डरचे मूल्य 700 कोटी रुपये आहे. मागील दोन आठवडयात एनबीसीसी कंपनीला 21,500 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. NBCC कंपनीला आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 23,500 कोटी रुपये मूल्याच्या नवीन वर्क ऑर्डर मिळाल्या होत्या. या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 70,000 कोटींपेक्षा जास्त आहे.
मागील काही दिवसांपासून एनबीसीसी स्टॉकमध्ये तेजीचा कल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, एनबीसीसी स्टॉकला 155 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 155 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 170 रुपये किमतीवर जाऊ शकतो. 2024 या वर्षात एनबीसीसी स्टॉक 97 टक्के वाढला आहे. याकाळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. 2023 मध्ये या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 110 टक्के परतावा कमावून दिला होता. 2014 पासून आतापर्यंत म्हणजेच मागील दहा वर्षात हा स्टॉक 439 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.