
NBCC Share Price | बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी सरकारी मालकीची कंपनी NBCC च्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी NBCC कंपनीचे शेअर्स 13.83 टक्के वाढीसह 35.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीला मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. NBCC कंपनीला स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SIDBI कडून 146 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. (NBCC Limited)
स्टॉक वाढीचे सविस्तर कारण :
NBCC या सरकारी मालकीच्या कंपनीला नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे, त्यामुळे स्टॉकमध्ये मजबूत तेजी आली आहे. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, सिडबीने सरकारी मालकीची कंपनी एनबीसीसीला 146 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट दिले आहे. हा प्रोजेक्ट बांधकाम, पुनर्विकास आणि सुविधा व्यवस्थापन सेवा पुरवण्यासाठी आहे. NBCC कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 43.80 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 26.70 रुपये होती. या वर्षी आतापर्यंत NBCC इंडिया कंपनीचे शेअर्स 13 टक्के कमजोर झाले आहेत.
कंपनीची कामगिरी :
NBCC इंडिया कंपनीने नुकताच सेबीला कळवले आहे की, कंपनीने झांबिया देशात ‘सिरोको एंटरप्रायझेस’ कंपनीशी करार केला आहे. झांबिया देशातील घरांची तीव्र कमतरता दूर करण्यासाठी NBCC कंपनी 1 लाख कमी आणि मध्यम किमतीची घरे बांधणार आहे. या गृहनिर्माण युनिटचे बांधकाम 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत NBCC कंपनीने 1586.68 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि या कालावधीत कंपनीने 48.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी , सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 1556.46 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्यात कंपनीने 99.46 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.