13 December 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

Brightcom Group Share Price | काय सांगता! गुंतवणूकदारांना करोडपती करणारा शेअर चिल्लर भावात मिळतोय, स्वस्तात खरेदी करावा का?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समधील घसरगुंडी अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के लोअर सर्किट लागला होता. सलग पाच दिवसापासून ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये घसरण सुरू आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.88 टक्के घसरणीसह 13.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देणारा स्टॉक क्रॅश झाला आहे. (Brightcom Group Limited)

‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,685.85 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 13.31 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 108.45 रुपये होती. ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअरच्या किमतीत प्रचंड घसरण झाली आहे. याबाबत कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला एक निवेदन जारी करून माहिती दिली की, “शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या भवितव्याबद्दल काही चिंता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. तथापि कंपनीच्या वतीने कंपनीचे अध्यक्ष गुंतवणूकदारांना खात्री देत आहेत की, कंपनी अजूनही मजबूत आर्थिक स्थितीत आहे. ब्राइटकॉम कंपनीच्या भविष्याबद्दल आणि डिजिटल जाहिरातीच्या विश्वातील कंपनीच्या स्पेस बद्दल सकारात्मक आहोत”. असे ते म्हणाले.

गुंतवणुकदार कंगाल :
मागील एका वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची किंमत 86.51 टक्के घसरली आहे. YTD आधारावर या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 54.37 टक्के नुकसान केले आहे. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य फक्त 12,000 रुपये राहिले असते. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 62.38 टक्के नुकसान केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price on 30 March 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x