
Money From IPO | शेअर बाजारातील चढ उतार आणि सुधारणांसह अनेक कमाईच्या संधी निर्माण होत असतात. मागील काही दिवसांत शेअर बाजारात पडझड झाल्यामुळे अनेक कंपनीचे आयपीओ रोखण्यात आले होते. आता बाजारात सुधारणा होत असून पुन्हा एकदा कंपन्या आपले IPO बाजारात आणण्याची तयारी करत आहेत. जर तुम्हाला ही IPO मध्ये गुंतवणूक करून बंपर नफा कमावण्याचा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पुढील काही दिवसात जबरदस्त कंपन्यांचे IPO येणार आहेत, तर अर्ज करण्यासाठी पैसे जमा करून ठेवा. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका अशा IPO बद्दल माहिती देणार आहोत, जो तुमचे पैसे लगेच वाढवू शकतो.
NBFC फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स :
या कंपनीचा IPO 9 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ही कंपनी आपल्या पब्लिक इश्यू ऑफरद्वारे 1,960 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करेल. अँकर गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करण्याची मुदत 7नोव्हेंबर 2022 ला खुली केली जाईल. किरकोळ गुंतवणूकदार 9 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. या IPO मध्ये कंपनी आपले शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी बाजारात आणणार आहे. कंपनीचे विद्यमान शेअर धारक आणि प्रवर्तक OFS/ऑफर फॉर सेल अंतर्गत त्यांचे स्टेक विकणार आहेत.
IPO मध्ये किमान गुंतवणूक मर्यादा :
या IPO मध्ये शेअरची किंमत 450 ते 474 रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारा या IPO मध्ये किमान एक लॉटसाठी अर्ज करू शकतात. एका लॉटमध्ये कंपनी 31 शेअर्सचे वाटप करेल. कोणताही किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉटसाठी अर्ज करू शकतो. गुंतवणुकदार किमान 14694 रुपये आणि कमाल 191022 रुपये गुंतवून IPO मध्ये अर्ज कर्ज करू शकतात. हा IPO 21 नोव्हेंबर 2022 ला सूचीबद्ध होण्याची शक्यता असून शेअरचे वाटप 16 नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण केले जाईल.
कंपनीबद्दल थोडक्यात :
फाइव्ह स्टार बिझनेस फायनान्स कंपनी सूक्ष्म उद्योजक आणि स्वयंरोजगारी व्यक्तींना सुरक्षित व्यवसाय कर्ज देण्याचे काम करते. चेन्नईस्थित ही कंपनी दक्षिण भारतात उद्योग करत आहे. दक्षिण भारतात कंपनी खूप नावाजलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. जून 2022 पर्यंत या कंपनीचा 85 टक्के उद्योग विस्तार आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये झालेला आहे. कंपनीच्या शाखा भारतात एकूण 8 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरल्या आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.