28 April 2024 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
x

Suzlon Share Price | मागील 6 महिन्यांत 186 टक्के परतावा देणारा सुझलॉन एनर्जी शेअर्स अप्पर सर्किटवर, पुढची टार्गेट प्राईस काय?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किट तोडत आहे. अशा जबरदस्त तेजीच्या काळात सुझलॉन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल आता 31,861 कोटी रुपयेवर पोहोचले आहे.

आज बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 25.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 186.59 टक्के वाढवले आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 563 टक्के नफा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीवर परतावा

मागील 3 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा मिळवून दिला आहे. 3 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 135.14 टक्के वाढले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 23.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने लोकांना 15.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर माहोल एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने 3.10 टक्के परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 218.00 टक्के परतावा कमावून दिला आहे.

स्टॉकवाढीचे कारण

मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीला एकामागून एक मोठ्या ऑर्डर प्राप्त होत आहेत. म्हणून स्टॉकमध्ये इतकी तेजी पाहायला मिळत आहे. आज देखील या कंपनीचे शेअर 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. नुकताच सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला O2 पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा भाग असलेल्या टेक ग्रीन पॉवर इलेव्हन प्रायव्हेट लिमिटेडकडून मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारानी मोठ्या परताव्याच्या अपेक्षेने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 71.6 अंकावर असून तो ओव्हरबॉट किंवा ओव्हर सोल्ड झोनमध्ये नाही असे कळते. सुझलॉन एनर्जी शेअर्सचा बीटा 1.7 आहे, जो वार्षिक उच्च अस्थिरतेचे संकेत देतो. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर खरेदी विक्री ट्रेड करत आहेत. सुझलॉन एनर्जी ही कंपनी अक्षय ऊर्जा संबंधित सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. या कंपनीचा व्यवसाय जगभरात 17 देशांमध्ये पसरला आहे. भारतात या कंपनीची पवन ऊर्जा क्षमता 13.9 GW आहे. आणि कंपनी विंड टर्बाइन बनवण्याचे काम देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 30 August 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(133)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x