 
						Nelco Share Price | नेल्को कंपनीच्या शेअरमध्ये शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. तर आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी नेल्को कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के घसरणीसह 609.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेल्को कंपनीचे शेअर्स व्यवहारा दरम्यान 5 टक्क्यांच्या वाढीसह 622.95 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेल्को कंपनीचे शेअर्स 595.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
या वर्षी मार्च 2023 महिन्यात नेल्को कंपनीचे शेअर्स 487 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. नुकताच तिमाही निकालांसोबत नेल्को कंपनीच्या संचालक मंडळाने 2 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणून 6 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
कंपनीची स्थिती :
टाटा समूहाचा भाग असलेली नेल्को कंपनी आपल्या ग्राहकांना खाजगी उपग्रह प्रक्षेपण सेवा प्रदान करते. मार्च 2023 तिमाहीत नेल्को कंपनीने आपल्या निव्वळ नफ्यात मागील वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेत 86 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. नेल्को कंपनीने याकाळात 7.71 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
त्याच वेळी मार्च 2023 तिमाहीत नेल्को कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 81.98 कोटी रुपये होते, जे आर्थिक वर्ष 2022 च्या मार्च तिमाहीत 71.69 कोटी रुपये नोंदवले गेले होते. या कंपनीचे एकूण उत्पन्न 13 टक्क्यांच्या वाढीसह 2023 च्या जानेवारी- मार्च या कालावधीत 82.83 कोटी रुपयेवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 73.23 कोटी रुपये होते.
गुंतवणूकीवर परतावा :
मागील तीन वर्षांत नेल्को कंपनीच्या शेअरची किंमत 283 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21.85 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13.97 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		