9 October 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

NHPC Share Price | 94 रुपयाचा PSU शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News

NHPC Share Price

NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीचे शेअर्स गुरुवारी 1 टक्के वाढीसह 95.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारी हा स्टॉक (NSE: NHPC) सुमारे 1 टक्के घसरणीसह क्लोज झाला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाने जलविद्युत प्रकल्पांसाठी 12461 कोटी रुपये निधीची तरतूद केली असून सुधारित वीज निर्मिती धोरणाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एनएचपीसी स्टॉकमध्ये उलाढाल पाहायला मिळत आहे. (एनएचपीसी कंपनी अंश)

या नवीन धोरणाचे उद्दिष्ट देशातील डोंगराळ प्रदेशात हायड्रोपॉवर पायाभूत सुविधा वाढवणे आहे. सुधारित वीज निर्मिती धोरणाअंतर्गत एकूण 31,450 मेगाव्हॅट वीज निर्मिती केली जाणार आहे. या सुधारित धोरणाअंतर्गत पारेषण लाईन, पॉवर हाऊस, पूलिंग पॉइंट, रोपवे, रेल्वे साइडिंग आणि दळणवळण प्रणाली यासारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे.

आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी एनएचपीसी स्टॉक 0.94 टक्के घसरणीसह 94.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या सुधारित धोरणात 25 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच या योजनेंतर्गत सुमारे 15,000 मेगावॅट क्षमतेचे पंप स्टोरेज प्रकल्प देखील उभारले जाणार आहे. 30 जून 2028 पूर्वी केंद्र पुरस्कृत सर्व PSPs अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार निधी मिळवण्यास पात्र असतील.

निधीचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय समर्थनाची मर्यादा तर्कसंगत करण्यात आली आहे. एनएचपीसी कंपनीला “नवरत्न” दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला NHPC कंपनीने वीज धोरणातील बदलानंतर जलसंपदा विभागासोबत सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले आहे. गुरुवारी एनएचपीसी स्टॉक 1.08 टक्के वाढीसह 95.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

Latest Marathi News | NHPC Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x