NHPC Share Price | PSU शेअर 1 आठवड्यात 10% घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा – NSE: NHPC

NHPC Share Price | मंगळवारी जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यामुळे अनेक शेअर्स जोरदार कोसळले होते. याचा फटका एनएचपीसी लिमिटेड कंपनी (NSE: NHPC) शेअरला सुद्धा बसला. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतणूकदारांची चिंता वाढल्याने स्टॉक मार्केट तज्ज्ञ रुचित जैन यांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)

NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचे मत
स्टॉक मार्केट तज्ज्ञ रुचित जैन यांच्या मते, मागील १ वर्षांत ज्या PSU शेअर्समध्ये बरीच वाढ झाली आहे, त्यातील अनेक शेअर्स शेअर सध्या करेक्शनच्या टप्प्यात आहेत. कारण या कालावधीत गुंतवणूकदारांनी या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती.

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर शॉर्ट टर्म मध्ये अजून घसरू शकतो. परंतु एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरला 75 रुपयांच्या आसपास मजबूत सपोर्ट आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे की एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर सध्या 80 किंवा त्यापेक्षा खाली ट्रेड करत आहे, परंतु शेअर्स थोडे दिवस HOLD करावा.

स्टॉक मार्केट तज्ज्ञ रुचित जैन यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला की, ‘गुंतवणूकदारांनी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर्स सध्या HOLD करावेत. तज्ज्ञांच्या मते, NHPC शेअर ७५ रुपयाच्या पातळीवरून बाऊंस बॅक झाला तर ८५ ते ९० रुपये पर्यंत जाऊ शकतो.

शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी एनएचपीसी शेअर 4.08 टक्के घसरून 78.70 रुपयांवर पोहोचला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.18 टक्के वाढून 79.53 रुपयांवर पोहोचला होता. सध्या एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 78,992 कोटी रुपये होते.

एनएचपीसी शेअरने दिलेला परतावा
मागील १ वर्षात एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 55.84% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 230.67% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 18.97% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price 23 October 2024 Marathi News.