 
						NINtec Systems Share Price | मागील एका वर्षात शेअर बाजारात अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. मागील एका वर्षात निंटेक सिस्टम्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1500 टक्के नफा कमावून दिला आहे. निंटेक सिस्टम्स कंपनीने आता एक नवीन घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सचे प्रमाण घोषित केलेले नाही.
मात्र लवकरच कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ बोनस शेअर्स चे प्रमाण निश्चित करतील. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी निंटेक सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 646.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीला दिलेल्या माहितीत निंटेक सिस्टम्स कंपनीने म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 19 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ बोनस शेअर्सच्या प्रस्तावावर निर्णय घेऊन सेबी ला त्याची माहिती देतील. सेबीला याची अधिकरिक माहिती मिळताच आपण त्याचे तपशील जाहीर करू. कंपनीच्या संचालकांची ही बैठक अहमदाबाद शहरात आयोजित करण्यात आली आहे.
मागील 1 वर्षात निंटेक सिस्टम्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1500 टक्के परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निंटेक सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 644.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 4.99 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे.
निंटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअरमध्ये 9 जून 2023 पासून अप्पर सर्किट लागत आहे. मागील एका वर्षात निंटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 129.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		