 
						Nova AgriTech IPO | नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र पहिल्याच दिवशी हा IPO फुल्ल झाला आहे. मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये इतकी गुंतवणूक केली की, IPO मध्ये पहिल्याच दिवशी 10 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. या कंपनीचा IPO 25 जानेवारी 2014 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 143.81 कोटी रुपये आहे.
नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही निर्देशांकावर सूचीबद्ध केले जाणार आहेत. नोव्हा अॅग्रीटेक कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 39 ते 41 रुपये निश्चित केली आहे. त्याच वेळी ग्रे मार्केटमध्ये नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचे IPO शेअर्स 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा स्टॉक 41 रुपये या अप्पर किंमत बँडनुसार वाटप करण्यात आला तर नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचे शेअर्स 61 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.
म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स वाटप केले जातील, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 50 टक्के नफा मिळू शकतो. नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचे IPO शेअर्स सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी वाटप केले जातील. 31 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजारात IPO स्टॉक सूचीबद्ध केला जाईल.
नोव्हा अॅग्रीटेक कंपनीचा IPO ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी एकूण 10.12 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. नोव्हा अॅग्रीटेक कंपनीने आपल्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला कोटा एकूण 13.32 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. त्याच वेळी गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 15.29 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 0.63 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
नोव्हा अॅग्रीटेक कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकत होते. कंपनीने एका लॉटमध्ये 365 शेअर्स ठेवले आहेत. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 14965 रुपये जमा करावे लागतील. तर 13 लॉटसाठी गुंतवणुकदारांना 194545 रुपये जमा करावे लागतील.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		