 
						Nova Agritech IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर ‘नोव्हा अॅग्रीटेक’ ही कृषी क्षेत्राशी संबंधित कंपनी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. या कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये 140 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. कंपनीचे नॉन प्रमोटर गुंतवणुकदार नुतलपती व्यंकटसुब्बाराव आपले 77.58 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहेत. वेंकटसुब्बाराव यांच्याकडे कंपनीचे एकूण 77.58 लाख शेअर्स म्हणजेच 11.9 टक्के भाग भांडवल आहे.
कंपनीने IPO मधून मिळणाऱ्या 14.20 कोटी रुपयांच्या फ्रेश इश्यूमधून मिळणारे पैसे त्यांची उपकंपनी ‘नोव्हा अॅग्री सायन्सेस’ मध्ये नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी खर्च करण्याची योजना आखली आहे. त्याच वेळी या IPO मधून ‘नोव्हा अॅग्रीटेक’ कंपनीच्या विद्यमान उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारासाठी निधी खर्च केला जाणार आहे. ‘कीनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’ आणि ‘बजाज कॅपिटल लिमिटेड’ यांना कंपनीने बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. IPO च्या माध्यमातून नुतलपती व्यंकटसुब्बाराव आपले सर्व शेअर्स विकणार आहेत.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘नोव्हा अॅग्रीटेक’ कंपनी मुख्यतः मृदा आरोग्य व्यवस्थापन, पीक पोषण, पीक संरक्षण उत्पादने बनवण्याचे काम करते. सध्या पीक संरक्षण उत्पादने त्याच्या उपकंपनी ‘नोव्हा अॅग्री सायन्सेस’ द्वारे बनवली जातात. जानेवारी 2023 पर्यंत या कंपनीने 629 उत्पादनांची नोंदणी केली आहे. ‘नोव्हा अॅग्रीटेक’ कंपनी सध्या भारतातील 16 राज्यांमध्ये 10,900 डीलर नेटवर्कसह व्यापार करत आहे. कंपनीचा व्यवसाय बांगलादेश, श्रीलंका, व्हिएतनाम या विकसनशील देशांमध्ये विस्तारला आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती :
‘नोव्हा अॅग्रीटेक’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीने 117.3 टक्क्यांच्या वाढीसह 13.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. याच कालावधीत कंपनीचा महसूल 15.5 टक्क्यांच्या वाढीसह 185.6 कोटी रुपयेवर गेला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		