
NTPC Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट खुला होताच किरकोळ तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स २७६ अंकांच्या तेजीसह ७६,११४ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी देखील 75 अंकांनी किरकोळ वाढीसह 23,099 वर पोहोचला होता. दरम्यान, मिरे ॲसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी कंपनी शेअरसाठी महत्वाचे संकेत दिले आहेत.
एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती
बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.53 टक्क्यांनी घसरून 319.35 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3,09,712 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 448.45 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 296.85 रुपये होता.
एनटीपीसी कंपनी शेअर टार्गेट प्राईस
बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी मिरे ॲसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मिरे ॲसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअर ३२० ते ३३० रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच शेअरमध्ये घसरण झाल्यास ३२० रुपयांच्या रेंजमध्ये अधिक शेअर्स खरेदी करावेत. ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना 315 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 3-4 आठवड्यांसाठी एनटीपीसी शेअरसाठी 360 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस असेल, तर 380 रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस असेल असं म्हटलं आहे.
एनटीपीसी कंपनी शेअरने किती परतावा दिला
बुधवार, 22 जानेवारी 2025 पासून मागील ५ दिवसात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर 1.28% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 4.29% घसरला आहे. गेल्या ६ महिन्यात हा शेअर 14.50% घसरला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 5.54 परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 178.30 टक्के परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 407.23 टक्के परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 4.29% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.