 
						NTPC Vs Power Grid Share Price | बुधवारी सेन्सेक्स निर्देशांक 78 अंकांच्या कमजोरीसह 84836 अंकांवर ओपन झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 41 अंकांच्या घसरणीसह 25899 अंकांवर ओपन झाला होता. मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉवर ग्रिड, हिंदाल्को, बीपीसीएल, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांचे शेअर्स तेजीत व्यवहार करत होते. ((NSE : NTPC – NSE: Power Grid )
चालू आठवड्यात शेअर बाजारातील तज्ञांनी पॉवर ग्रिड, एनटीपीसी, बीईएल आणि डाबर यासारख्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. चला तर मग या सर्व शेअर्सवरील टॉप इन्व्हेस्टमेंट बँक्स आणि ब्रोकरेज फर्मची रेटिंग आणि टारगेट प्राईज जाणून घेऊ.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया :
गोल्डमन सॅक्स फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन 370 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.51 टक्के वाढीसह 356.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नुकताच पॉवर ग्रिड कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ करण्यासाठी भारत सरकारने आपला ट्रान्समिशन कॅपिटल खर्च 110 अब्जपर्यंत अपग्रेड केला आहे.
एनटीपीसी लिमिटेड :
गोल्डमॅन सॅक्स फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन 430 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के वाढीसह 444.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. एनटीपीसी कंपनीची उपकंपनी असलेल्या एनटीपीसी ग्रीनचा नफा वाढला आहे. इन्व्हेस्टमेंट बँकेने एनटीपीसी कंपनीचे मूल्यांकन 4117 अब्ज रुपये केले आहे. तर एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचे मूल्यांकन 784 अब्ज रुपये केले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड :
मॅक्वेरीने फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन 350 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.11 टक्के घसरणीसह 287.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
डाबर :
यूबीएस फर्मने या कंपनीच्या शेअर्सवर न्यूट्रल रेटिंग देऊन 700 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 630.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. डाबर कंपनीसाठी मुख्य चिंतेची बाब म्हणजे त्यांचे महागडे मूल्यांकन आणि शीतपेयांच्या विक्रीतील वाढीतील जोखीम क्षमता जास्त आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		