5 May 2024 2:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Bank of Maharashtra | मार्ग श्रीमंतीचा! बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा मिळेल, पैसा दुप्पट करणारी अपडेट

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी आज रविवारी मोठी फायद्याची अपडेट समोर आली आहे. बँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या शेअरने गेल्या तिमाहीतील आकडेवारीनुसार 1 महिन्यात (ऑगस्ट 2023) गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 1 महिन्यात (ऑगस्ट 2023) येथे 20 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली होती.

बँक ऑफ महाराष्ट्र शेअर – तज्ज्ञांनी काय म्हटले?
तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे येत्या तीन ते चार तिमाहीत हा शेअर सध्याची पातळी दुप्पट करू शकतो, म्हणजे तब्बल १०० टक्के परतावा देऊ शकतो. सध्या (24 डिसेंबर2023) बँक ऑफ महाराष्ट्र शेअर 45.60 रुपयांवर आहे. विशेष म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र शेअरमध्ये दीर्घकाळासाठी (5 वर्ष) गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल 202.99% परतावा मिळाला आहे.

मागील तिमाहीतील शेअरची कामगिरी (July To September 2023)
बँक ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या शेअरची ऑगस्ट या 1 महिन्यातील कामगिरी पाहिली तर 4 ऑगस्ट 2023 रोजी हा शेअर जवळपास 33.85 रुपयांवर ट्रेड करत होता. या काळात शेअरमध्ये २१ टक्क्यांची वाढ झाली आणि 6 सप्टेंबर 2023 रोजी तो 41.10 रुपयांवर पोहोचला. त्यापूर्वीच्या 3 महिन्यांची कामगिरी पाहिली (April To June) तर 8 जून 2023 रोजी हा शेअर 30.35 रुपयांवर होता. त्यावेळी शेअर 52 आठवड्यांचा उच्चांक म्हणजे 42.70 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, मागील शुक्रवारच्या (24 डिसेंबर 2023) ट्रेडिंग सेशनमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर हा शेअर 45.60 रुपयांवर व्यवहार करत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र चार्ट काय सांगतो?
खरं तर शेअरची टेक्निकल नजर टाकली तर ऑगस्ट महिन्यात या शेअरने आपली 8 महिन्यांची कंसॉलिडेशन रेंज तोडली आणि जवळपास 36 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गेल्या 3 महिन्यांचा चार्ट पाहिला तर येथे घसरत्या ट्रेड लाइनसह शेअरमध्ये ब्रेकआऊट दिसून आला आहे, ज्यामुळे हा शेअर जवळपास 80 रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता वाढली आहे. या शेअरला त्याच्या दैनंदिन चार्टवर 200 डीएमएपेक्षा जास्त सपोर्ट मिळत असल्याचे दिसून येत आहे. 5,10,30,50,100 आणि 200 डीएमएच्या महत्त्वाच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत असल्याने हा शेअर आणखी तेजीची चिन्हे दाखवत आहे.

तज्ञांनी खरेदीची शिफारस केली
वेलवर्थ शेअर अँड स्टॉक ब्रोकिंग लिमिटेडचे टेक्निकल अॅनालिस्ट सुजित देवधर यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, कोणताही गुंतवणूकदार पुढील 3-4 तिमाहींसाठी (1 वर्ष किंवा त्याहून कमी कालावधी) हा शेअर 85 रुपयांच्या टार्गेट प्राईसने खरेदी करू शकतो. सध्या बँक ऑफ महाराष्ट्र्र शेअरची किंमत 45.60 रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra Share Price NSE 24 December 2023.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x