
Nykaa Share Price | ब्युटी प्रॉडक्ट स्टार्टअप कंपनी Nykaa चे शेअर्स पडझडीच्या गर्तेत अडकले आहेत. जिथे एका बाजूला कंपनीचे शेअर्स रोज नवनवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श करत आहेत, तर दुसरीकडे कंपनीचे दिग्गज गुंतवणूकदार शेअर्स विकून बाहेर पडत आहेत. हे कमी की काय, आता कंपनीच्या व्यवस्थापन स्तरावरील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. Nykaa चे मुख्य वित्तीय अधिकारी/CFO अरविंद अग्रवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत अग्रवाल आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि कंपनीचा निरोप घेतील.
CFO ने कंपनी सोडली :
Nykaa कंपनीच्या CFO पदाचा राजीनामा देण्यावर अग्रवाल म्हणाले की, “Nykaa कंपनीच्या आतापर्यंतच्या अविश्वसनीय प्रवासाचा एक भाग म्हणून खूप छान अनुभव आला. आतापर्यंतच्या माझ्या सर्व ज्ञान आणि अनुभवांमुळे मला डिजिटल अर्थव्यवस्था आणि स्टार्टअपमध्ये वाढ होण्याची शक्यता वाटत आहे. मी Nykaa कंपनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मी नेहमी Nykaa कंपनीच्या कुटुंबाचा एक भाग राहीन आणि त्यासाठी आपले आभार प्रकट करत राहीन”.
शेअर्सची स्थितीही खराब :
Nykaa कंपनीच्या शेअरची या आठवड्यात सुरुवात खूपच खराब झाली होती. आज या कंपनीचा शेअर 4.66 टक्के पडला असून शेअरची किंमत 174.95 रुपयांवर आली आहे. याआधी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Nykaa कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांहून अधिक कमजोरी सह ट्रेड करत होते. या कंपनीतील शेअरची लॉक-इन कालावधी 10 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण झाला असल्याने मोठे गुंतवणूकदार आपले शेअर्स विकून कंपनीतून बाहेर पडत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्युचुअल फंड कंपनी लाइटहाउस इंडियाने Nykaa कंपनीतील आपले 365 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.