
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नायका कंपनीने सोमवारी आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल केले, आणि शेअरमध्ये तेजी सुरू झाली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 147.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील सहा महिन्यांत नायका कंपनीच्या शेअरची किंमत 13 टक्के वाढली आहे. मात्र तरीही नायका स्टॉक 224.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 34 टक्के कमजोर आहे. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी नायका स्टॉक 2.38 टक्के वाढीसह 150.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सप्टेंबर 2023 च्या तिमाहीमध्ये नायका कंपनीने YoY आधारे महसुलात दुहेरी अंकी वाढ साध्य केली आहे. नायका कंपनी प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने, पर्सनल केअर आणि फॅशन क्षेत्रात व्यवसाय करते. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने नायका कंपनीच्या व्यापार मुक्यात वार्षिक 25 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
सप्टेंबर तिमाहीत नायका कंपनीने सर्व व्यापारी विभागांमध्ये मजबूत कामगिरी केली आहे. सकारात्मक ऑपरेटिंग लिव्हरेजमुळे कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने नायका कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये 5.9 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
नायका कंपनीचा IPO शेअर बाजारात 2021 मध्ये लाँच करण्यात आला हीट. नायका कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 1125 रुपये निश्चित केली होती. नायका कंपनीचे शेअर्स 2000 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअरने स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते.
मागील वर्षी नायका कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. यानंतर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात फार मोठे फर बदल झाले, आणि त्यामुळे कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.