
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. नायका कंपनीची मूळ कंपनी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारी 3.74 टक्क्यांच्या वाढीसह 170.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश )
आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. नायका कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 195.40 रुपये होती. हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीपेक्षा 14.51 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. आज सोमवार दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी नायका स्टॉक 5.55 टक्के वाढीसह 177.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते नायका कंपनीच्या शेअर्समध्ये 160 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या मते, नायका स्टॉकमध्ये 170 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी या शेअर्सची ट्रेडिंग रेंज 165 रुपये ते 185 रुपये दरम्यान असेल. हा स्टॉक पुढील काळात किंमत 195 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, नायका स्टॉक पुढील काळात 195 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी 158 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावले पाहिजे.
नायका कंपनीचा IPO 2021 साली शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 1125 रुपये होती. आणि हा स्टॉक 2000 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. त्यानंतर या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. नायका कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत प्रचंड नफा कमावला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीचा नफा वार्षिक आधारावर 106 टक्क्यांच्या वाढीसह 17.5 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 8.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर सप्टेंबर 2023 तिमाहीत कंपनीला 7.8 कोटी रुपये नफा मिळाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.