24 October 2024 10:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Reliance Power Share Price | स्वस्त रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत

Reliance Power Share Price

Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 29.88 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 या वर्षात रिलायन्स पॉवर स्टॉक 35 टक्के मजबूत झाला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )

मागील वर्षी या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 1.31 टक्के वाढीसह 30.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रिलायन्स पॉवर ही कंपनी आता स्वतंत्र आधारावर कर्जमुक्त कंपनी बनली आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 36 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. चॉइस ब्रोकिंग फर्मच्या मते, या स्टॉकची ब्रेकआउट लेव्हल 28 रुपये किमतीवर आहे.

रिलायन्स पॉवर स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहे. पुढील काळात हा स्टॉक 36 रुपये किमतीवर जाऊ शकतो. नुकताच रिलायन्स पॉवर कंपनी कर्जमुक्त झाली आहे. या कंपनीवर 800 कोटी रुपये कर्ज होते, जे कंपनीने बँकांना परतफेड केले आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा धोरणाचा फायदा रिलायन्स पॉवर कंपनीला होऊ शकतो.

डिसेंबर 2023 मध्ये रिलायन्स पॉवर कंपनीने अरुणाचल प्रदेशमधील 1,200 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पाचे विकास हक्क THDC ला 128 कोटी रुपयेला विकले आहे. मार्च 2024 मध्ये या कंपनीने महाराष्ट्रातील 45 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्प 132 कोटी रुपयेला JSW रिन्युएबल एनर्जी कंपनीला विकला आहे. या प्रकल्पांच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम कंपनीने आपले थकीत कर्ज फेडण्यासाठी खर्च केली आहे.

रिलायन्स पॉवर कंपनीकडे 38 लाखांपेक्षा जास्त किरकोळ गुंतवणूकदारांच्या सहभागासह 4,076 कोटी रुपये मूल्याचा शेअर बेस आहे. रिलायन्स पॉवर कंपनीची ऑपरेटिंग क्षमता 5900 मेगावॅट असून त्यात उत्तर प्रदेशातील 3960 मेगावॅट क्षमतेचा सासन अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प आणि 1200 मेगावॅट क्षमतेचा रोजा थर्मल पॉवर प्लांट देखील सामील आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Power Share Price NSE Live 25 June 2024.

हॅशटॅग्स

Reliance Power Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x