
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली आहे. मागील 4 वर्षांत आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 19 रुपयेवरून वाढून 430 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 2100 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.14 टक्के घसरणीसह 407.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( रेल विकास निगम कंपनी अंश )
आरव्हीएनएल कंपनीने 21 जून रोजी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, कंपनीला 191.53 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. कंपनीला हे काम करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 13 जून रोजी आरव्हीएनएल कंपनीला ईस्ट कोस्ट रेल्वे विभागाकडून 160.08 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट मिळाले होते. हे काम करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
मागील वर्षी मे महिन्यात आरव्हीएनएल कंपनीला नवरत्न दर्जा बहाल करण्यात आला होता. 26 जून 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 24 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 432 रुपये किमतीवर पोहचला आहे. जर तुम्ही 26 जून 2020 रोजी आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 22.21 लाख रुपये झाले असते.
मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 123.20 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. तर 24 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 432 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत आरव्हीएनएल स्टॉकची किंमत 140 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 117.35 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.